महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप) – आयपीएलच्या नावाखाली अवैध सट्टा जुगार चालवणाऱ्या टोळीला लातूर LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात LCB पथकाच्या पोलिसांनी जोरदार धडक कारवाई केली आहे LCB प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ एप्रिल २०२६ रोजी निलंगा परिसरात साडेआठ वाजता अचानक छापा टाकून दोन मुख्य आरोपींना रंगेहाथ पकडले. या कारवाईत तब्बल ४ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या कडक निर्देशानुसार आणि अपर अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेने ही मोहीम राबवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आयटीआय कॉलेज, निलंगा जवळील दादगी शिवारात (दादगी ते भंगार चिंचोली रोड) सट्टा जुगार चालवला जात असल्याचे समजले. सायंकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने धाड घातली.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) लखन ऊर्फ बाबा महापु कांबळे (वय २९, रा. मिलिंद नगर पेठ, निलंगा)
2) पवन दयानंद कांबळे (वय २६, रा. मिलिंद नगर पेठ, निलंगा)
जप्त मुद्देमाल
६ मोबाईल फोन
सट्टा व्यवहार नोंदविणारे कागदपत्र
१ बॉलपेन
होंडा अॅक्टिव्हा स्कूटर (MH 24 BF 7217)
एकूण किंमत : ₹४,५०,०००/-
प्राथमिक चौकशीत दोन्ही आरोपींनी कबूल केले की, ते चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल सामन्यावर फोनद्वारे सट्टा स्वीकारत होते. हा सट्टा मुंबईतील मुख्य बुकी ‘रवि शेट’ साठी चालवला जात होता. आरोपी रोजचा सट्टा व्हॉट्सअॅपवर पाठवत आणि त्याबदल्यात १० टक्के कमिशन घेत असत. या प्रकरणी आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य बुकी ‘रवि शेट’चा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. या कारवाइत पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, पोलीस अंमलदार प्रदीप स्वामी, युवराज गिरी, नवनाथ हासबे, राजेश कंचे, जमीर शेख, राहुल कांबळे सहभागी होते.
लातूर पोलिसांचा स्पष्ट इशारा
“आयपीएलच्या नावाखाली युवकांना बरबाद करणाऱ्या कोणत्याही सट्टा टोळीला आम्ही चिरडून टाकू! लातूर जिल्ह्यात अशा अवैध कारवायांना आता पूर्णविराम लागणार आहे!” पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेनुसार अवैध जुगार आणि सट्ट्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलिसांची ही आक्रमक आणि सलग कारवाई सुरूच राहील, असा इशारा देण्यात आला आहे.








