महाराष्ट्र खाकी ( लातूर विवेक जगताप ) – कष्ट, निष्ठा, संस्कार आणि प्रेमाचा आदर्श! संतोष (मामा)बेंबडे यांना मुलगा डॉ. ओंकार बेंबडे यांची भावुक वाढदिवस शुभेच्छा, लातूर जिल्ह्यात कष्टाने आणी संस्काराणे माणुसकीचे साम्राज्य उभारणारे, निष्ठा, मैत्री आणि दिलेल्या शब्दासाठी जगणारे आणी आमदार अभिमन्यू पवार यांचे खांदे समर्थक व सावली असलेले संतोष बेंबडे (ज्यांना युवा पिढी प्रेमाने संतोष मामा म्हणते) यांचा वाढदिवस यंदा फारच अनोख्या आणि भावुक पद्धतीने साजरा झाला.
औसा आणी लातूर शहर भरात बॅनर्स लावण्यात आले, अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या, तर काहींनी सामाजिक उपक्रम राबवून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बहुतांश युवा वर्गाने त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. पण यावर्षीची सर्वात हृदयस्पर्शी आणि अनोखी शुभेच्छा आली ती त्यांच्या स्वतःच्या मुलाकडून – डॉ. ओंकार बेंबडे यांच्याकडून. डॉ. ओंकार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर करत वडिलांना शब्दांची फुले उधळली. ही पोस्ट लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, सर्वत्र भावनिक चर्चा सुरू आहे.
डॉ. ओंकार बेंबडे यांची हृदयद्रावक शुभेच्छा:
“माझ्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या आधारस्तंभाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
पप्पा,
तुम्ही मला कधी मोठ्या शब्दांत शिकवलं नाही, पण तुमचं आयुष्यच माझं पुस्तक आहे.
तुमच्याकडून मी शिकलो –
माणूस मोठा पैशाने होत नाही… तो मोठा होतो त्याच्या शब्दाने, निष्ठेने आणि लोकांच्या आशीर्वादाने.
मी तुमचा मुलगा आहे, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी ओळख आहे. तुमचं नाव घेताना छाती अभिमानाने भरून येते.
तुम्ही फक्त माझे वडील नाही,
तुम्ही माझी ताकद, माझा आत्मविश्वास आणि माझ्या आयुष्याची दिशा आहात.
लोकांची सेवा करता, पण एक माणूस म्हणून लोकांच्या मनात जागा बनवता. तुमचं नेतृत्व ठाम आहे, निर्णय पक्के आहेत, पण मन मात्र खूप प्रेमळ आणि साधं आहे.
खरा मोठेपणा पदात नसतो, तो वागण्यात असतो.
लोकांसाठी उभं राहणं हीच खरी जबाबदारी असते.
परिस्थिती काहीही असो, डोकं उंच ठेवून जगायचं असतं.
तुमच्यावर माझं खूप प्रेम आहे.
तुमच्या प्रत्येक संघर्षामागची ताकद मला दिसते.
एक दिवस तुमच्यासारखाच मजबूत माणूस बनायचं आहे – हीच माझी इच्छा आहे.
देवाकडे एकच प्रार्थना – तुम्ही नेहमी निरोगी, आनंदी आणि हसतमुख राहा. तुमचं नाव, तुमचं काम आणि तुमचा आदर्श अजून उंची गाठो.
❤️ Happy Birthday Papa
तुमचा मुलगा असल्याचा मला सदैव अभिमान आहे!”
ही पोस्ट वाचून संतोष बेंबडे यांना नक्कीच डोळे भरून आले असतील. कष्टातून उभं केलेलं साम्राज्य आणि माणुसकीचे संस्कार यांचा अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसला असेल.
डॉ. ओंकार बेंबडे यांच्या या शब्दांनी केवळ वडिलांना शुभेच्छा दिल्या नाहीत, तर पिता-पुत्रातील निखळ प्रेम, आदर्श संस्कार आणि खऱ्या मोठेपणाची व्याख्या सर्वांना साद घातली आहे. लातूरकरांसाठी ही एक खूप सुंदर, भावनिक आणि प्रेरणादायी घटना ठरली आहे. अशा हृदयस्पर्शी क्षण समाजात सकारात्मक ऊर्जा आणि कुटुंबीय बंधन अधिक दृढ करतात. संतोष बेंबडे तुमच्या कष्टाने, निष्ठेने आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्वाने लातूर जिल्ह्यात अनेक युवकांना प्रेरणा मिळत आहे.








