मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार अभिमन्यू पवार यांच्या (मतदारसंघात) औशात गोपाळ चालवतोय खुलेआम सट्टा बाजार, पोलिसांचा पूर्ण सायलेंट मोड!

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर  काबीज केल्यानंतर आता औसा मध्ये गोपाळच्या क्रिकेट सट्ट्याचा भयंकर आगडोंब उसळला आहे! मुख्यमंत्री आणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘आवडते’ आणि ‘विश्वासू’ आमदार अभिमन्यू पवार यांच्या औशात हा गोपाळ क्रिकेट सट्टा दिमाखात, बिनधास्त आणि खुलेआम चालवत आहे. आमदारांच्या ‘अथक मेहनती’ मुळे औसा मतदारसंघात ‘शेरस्त्याचा पॅटर्न’ निर्माण झाला आहे याचे राज्यच नव्हेतर देशात कौतुक होत आहे , पण आता याच आमदार अभिमन्यू पवारांच्या औशात आता तरुणांणची वाट लावणारा हा सट्टा बाजार तेजीत आहे!

लातूर पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांना या सट्टा बाजाराची पूर्ण माहिती कशी नाही? ते हातावर हात धरून का बसले आहेत?. एकही धाड, एकही अटक, एकही कारवाई नाही? गोपाळला अटक किंवा कारवाई का नाही?, लातूर शहरानंतर आता औसा  पूर्णपणे गोपाळच्या सट्ट्याच्या ताब्यात गेला आहे. लोक १० ते २० टक्के व्याजाने कर्ज काढून सट्ट्यात पैसा ओतत आहेत. घर, शेती, व्यवसाय संपवून तरुणाई रस्त्यावर येत आहे, तरीही पोलिसांचे कान बंद, डोळे मिटलेले!

आमदार अभिमन्यू पवार यांच्या ‘विकासाच्या राजकारणा’मुळे औसा मतदासंघातील जनतेचे उत्पन्न वाढले आहे, पण प्रत्यक्षात या सट्ट्यामुळे शेकडो कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. औसा आणि लातूर शहरातील लोक आता एकच प्रश्न विचारत आहेत – आमदार अभिमन्यू पवार, तुम्ही या विषयात लक्ष घालणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ‘विश्वासू’ आणी ‘लाडके ‘ आमदार तुमच्या औसा शहरात आणी परिसरात या गोपाळने आपला सट्टा बाजार वाढवला कसा आणी यावर लातूर पोलिस बघ्याची भूमिका का घेत आहे ?

जर लवकरात लवकर या क्रिकेट सट्टा चालवणाऱ्या गोपाळ आणि त्याच्या टोळीवर कडक कारवाई झाली नाही, तर औशातील तरुणाई आणि त्यांच्या संसाराचे  पूर्णपणे वाटोळे होईल . आमदार अभिमन्यू पवार  सट्टेबाजीच्या या भयंकर जाळ्यातून औशाच्या जनतेला बाहेर काढण्याची जबाबदारी तुमची आहे.

Recent Posts