महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – किल्लारी पोलीस स्टेशन येथील बेवारस वाहनांचा 18 मार्च, 2025 रोजी लिलाव करण्यात येणार आहे. या लिलावाकरिता औसा नायब तहसीलदार, औसा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी (आर.टी.ओ) लातूर हे उपस्थित राहणार आहेत. मोटार सायकल क्र. एम.एच.25 जे 0612 (हिरो होंडा स्प्लेंडर प्लस), एम.एच.05 ए.ए.1354 (टि.व्हि.एस. फेरो मोटार सायकल), एम.एच. 14 जी.बी.
6078 (हिरो होंडा स्प्लेंडर प्लस) या वाहनांचा लिलाव होणार असून या लिलावाकतिरा इच्छुकांनी 17 मार्च, 2025 रोजी पर्यंत किल्लारी पोलीस स्टेशन येथे भेट देवून लिलावात सहभागी होण्याकरिता माहिती द्यावी. त्यानंतर देण्यात येणाऱ्या माहितीचा विचार केला जाणार नाही. तरी नमूद तीन मोटार सायकलचे लिलावाची व इच्छूकांनी 17 मार्च, 2025 रोजीपर्यंत किल्लारी पोलीस स्टेशन येथे भेट देवून लिलावात सहभागी होण्याकरिता माहिती द्यावी, असे किल्लारी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. व्ही. व्ही. शहाणे यांनी कळविले आहे.
