महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शिवाजी नगर स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांच्या निष्काळजीपणामुळे पोलीस स्टेशनच्या भिंती आणि आवरतील झाडांचे बुड लाले – लाल आणि हाकेच्या अंतरावर असलेल्या पानटपऱ्यावर बिनधास्त मिळतो गुटखा आणि सुपाऱ्या, लातूर शहरातील शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या भिंती, आवरतील झाडांचे
बुड, गेट चे कोपरे पोलीस आणि नागरिक यांनी थुंकून लाल करून सोडले आहे, याचे कारण शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या 100 मिटरच्या आवरतील पानटपऱ्यावर बिनधास्त मिळणारा गुटखा आणि सुपाऱ्या आहेत, पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांचे या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्यामुळे पोलीस स्टेशन
आवारात अस्वछता दिसून येत आहे. भिंतीला कान असतात’ असे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. भिंतीला बोलता आले असते तर, तर गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणाऱ्यांना नक्कीच भिंतीची बोलणी खावी लागली असती. गुटखा बंदीमुळे भिंतींना तुच्छ करून थुंकणाऱ्याची संख्या कमी होणार असली तरी याला कारण म्हणजे
पोलीस निरीक्षक दिलीप सागर यांचे दुर्लक्ष होय, कारण पोलीस निरीक्षक यांनी लक्ष दिले असते तर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोडा फक्त 100 मीटरच्या आतील पानटपऱ्यावर बिनधास्त बंदी असलेला गुटखा (विमल, रजनीगंधा आणि घासून सुपाऱ्या ) मिळत आहे. पोलीस स्टेशनला कामानिमित्त आलेले नागरिक आणि पोलीस
कर्मचारी याच टपऱ्यावर जाऊन गुटखा, सुपारी खाऊन पोलीस स्टेशनच्या भिंती लाल करत आहेत, पोलीस निरीक्षक सोमय मुंडे आणि IG शहाजी उमाप जिल्हा गुटखा मुक्ती साठी आणि थुंकीमुक्त पोलीस स्टेशन साठी कडक कारवाया करत आहेत पण शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर दुर्लक्ष करत आहेत ही बाब खूप गंभीर आहे, या गोष्टीकडे जिल्हा पोलीस SP आणि नांदेड परिक्षेत्राचे IG लक्ष घालतील का ?