महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षा मुळे लातूर शहरासह जिल्ह्यात बिअरबार, परमिटरूम, देशी दारू दुकानात सर्रासपणे नियमाचे उल्लघंन होत असताना दिसत आहे, बिअरबार, परमिटरूम, देशी दारू दुकान परवाना धारकाकडूनही नियमाचे राजरोसपणे उल्लघंन
होत असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी ‘अर्थपूर्ण’ बोलणी करून नियमाचे उल्लघंन करून व्यवसाय करणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. याबाबत राज्य उत्पादन मंत्री शंभूराज देसाई, लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी लक्ष घालावे अशी मागणी केली जात
आहे. लातूर शहरातील 4-5 बार तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी चालवायला घेतले आहेत फक्त दुसऱ्याच्या नावावर दाखवले आहेत, लातूर शहरासह जिल्ह्यात असलेल्या बार व देशी दारू दुकानात सर्रासपणे नियमाचे उल्लघंन केले जात आहे. अनेक बारमध्ये शौचालय व प्रसाधन गृह नाहीत. शिविय चढ्या भावाने
दारू विक्री केली जाते याकडे दुर्लक्ष केले जात आहे. संबंधित बिअर बारमालकावर कोणत्याही दारू बंदी अधिकाऱ्यांची वचक राहीला नाही. फक्त महिण्याला येऊन ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करून ते गायब होत असतात. लातूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात हॉटेलच्या नावाखाली देशी, विदेशी, हातभट्टी विकली जाते. यांना
राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी व कर्मचारी यांचा आशीर्वाद आहे. शहर व जिल्ह्यातील वैध व अवैध दारू विक्री करणाऱ्यासाठी राज्य उत्पादन विभागातील एक कर्मचारी हप्ते वसूलीसाठी खास ‘कारभारी’ म्हणून नियुक्त केला आहे असे काही बारमालक सांगत आहेत, बनावट दारू ही संपूर्ण बार मध्ये विक्री केली जाते. मात्र याकडे
राज्य उत्पादन शुल्क अधिकारी केशव राऊत सपशेल कानाडोळा करत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील अनेक बार चालकांना वेळेचे बंधन नाही. कधीही चालू करत असतात. बिअर बार मालकावर वचक नसल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांनी डोके वर काढले आहेत.