महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील ब्रिज हॉटेल चालक ब्रिजवासी यांची मिठाई खाल्ल्यामुळे लातूर शहर वाहतूक विभाग ब्रिज हॉटेल वर महेरबान आहेत का ? म्हणून ब्रिज हॉटेल मालक ब्रिजवासी यांची मनमानी चालू आहे. ब्रिज हॉटेल हे छत्रपती शिवाजी महाराज
चौकात आहे या चौकात वाहनांची संख्या जास्त असते आणि ब्रिज हॉटेल ला पार्किंग ची वेवस्था नसल्यामुळे हॉटेल मध्ये जाणारे लोक त्यांची वाहने रस्त्यावर पँकिंग करतात किंवा रस्त्यात गाड्या थांबून हॉटेल मध्ये जात किंवा बाहेर येत असल्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी होते आणि चौकातली वाहतूक वेवस्था विसखळीत होते. तरी
देखील लातूर वाहतूक शाखा ब्रिज हॉटेल वर महेरबान आहे का ? असे शहरातील नागरिक चर्चा करत आहेत. ब्रिज हॉटेल मध्ये रेस्टॉरंट, लॉजिंग आणि फंगशन हॉल आहे या वेगवेगळ्या विभागात दिवस भरातून हजारो लोक या ब्रिज हॉटेल मध्ये येत असतात आणि त्यांच्या गाड्या असतात पण ब्रिज हॉटेल ला साठी 7-8 गाड्याची पार्किंग
वेवस्था नाही म्हणून ब्रिज हॉटेल मुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक विसखळीत होऊन लोकांना त्रास होत आहे. या ब्रिज हॉटेल च्या निष्काळजी पणा मुळे रुग्णवाहिकेला सुद्धा ट्राफिक जाम चा फटका बसत आहे. आता तरी लातूर शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम लक्ष देऊन ब्रिज हॉटेल वर कारवाई करतील का ?