महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जर ठरवले तर लातूर शहरला स्थायी आमदार म्हणून अमित च देऊ शकतात, मागील तिन टर्म लातूर शहरचे आमदार अमित देशमुख असले तरी लातूर शहर मतदारसंघातील लोकांची नेहमी काही तक्रारी राहिली आहे त्या म्हणजे लातूरचे
आमदार लातूरला न राहता मुबंईत राहतात आणि लातूरचा कारभार मुंबई मधून पाहतात आणि ते लातूरला फक्त पर्यटणासाठी येत असतात, लोकांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणी यांच्याशी त्यांचे काहीच देणेघेणे नसल्यासारखे वागतात लातूरकरांच्या या तक्रारी मराठा आरक्षण आंदोलक यांनी निवडणुकीसाठी इच्छुकांचे अर्ज
मागवले होते, यात लातूर शहर मधून उच्यशिक्षित आणि समाजसेवेत अग्रेसर असणारे व्यावसायिक डॉ. अमित पाटील यांनी जरांगे पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे, डॉ. अमित पाटील यांनी अर्ज दाखल करावा यासाठी लातूर शहरातील विवीध क्षेत्रातीला लोकांनी पुढाकार घेतला होता. लातूर शहरातील तरुण वर्ग सर्वात जास्त
उत्साही आहे की डॉ. अमित पाटील यांना उमेदवारी मिळावी आणि लातूर शहराला स्थायी आणि लोकांना सहज उपलब्ध होणारा आमदार मिळावा. आमदार अमित देशमुख यांनी लातूर करांना गृहीत धरले आहे असे सर्वाना दिसून येत आहे म्हणून डॉ. अमित पाटील यांना मनोज जरांगे पाटील यांनी लातूरकरांच्या या मागणीची गंभीर दखल घेऊन डॉ. अमित पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत आहे.