महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी माजी आमदार वैजेनाथ शिंदे यांच्या काडून फेटा बांधण्यास भर स्टेजवर दिला नकार, विलास साखर कारखान्याची 22 वी
सर्वसाधारण सभा होती त्या सभेत सर्व मान्यवर उपस्तित होते, धाराशिवचे आणि लातूरचे नवनिर्वाचित खासदार
ओमराजे निंबाळकर आणि डॉ. शिवाजी काळगे यांचा दिलीपराव देशमुख यांनी स्वतःच्या हाताने फेटा बांधून सन्मान आणि सत्कार केला, पण दिलीपराव देशमुख यांनी दोन्ही खासदारांना बांधलेले फेटे पाहून स्टेजवरील मान्यवरांना आणि समोरील सभासदांना आणि लोकांना खूप छान वाटले आणि या गोष्टीचे कौतुक ही झाले. पण
दिलीपराव देशमुख यांनी बांधलेले फेटे हे साधारण पद्धतीने बांधले होते ते प्रोफेशनल पद्धतीने बांधतात तसे दिसत नव्हते बहुधा हे धीरज देशमुख यांच्या लक्षात आले असावे, जेव्हा आमदार धिरज देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी माजी आमदार वैजेनाथ शिंदे आले तेव्हा शिंदे यांनी फेटा हातात घेतला व फेटा पुढे करत धिरज देशमुख यांना
म्हणाले की फेटा बांधतो धीरज देशमुख यांनी हात पुढे
करत मान हालउन नकार दिला तरी मा. आमदार शिंदे यांनी परत एकदा म्हणाले की मी फेटा बांधतो म्हणून पुन्हा फेटा पुढे करत होते तेव्हा परत एकदा धीरज देशमुख यांनी नकार दिला तेव्हा मात्र माजी आमदार शिंदे शांत उभे राहिले ही गोष्ट घडत असतात आयोजकांनी प्रोफेशनल
फेटा बांधणारा माणूस बोलावला तेव्हा आमदार धीरज देशमुख यांनी फेटा बांधून घेतला, जसे 2014 च्या निवडणुकीच्या वेळेस नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात भर स्टेजवर मुस्लिम टोपी घालण्यास हाताने आडउन स्पष्ट नकार दिला होता तशा प्रकाची घटना होती. आमदार धीरज देशमुख यांच्या पेक्षा वयाने मोठे असलेल्या मा.
आमदार वैजेनाथ शिंदे यांच्याकडून फेटा न बांधून एक प्रकारे त्यांचा अनादर (अपमान ) केला असे कार्यक्रमातील लोक आणि कारखान्याचे सभासद यांच्यात जोरात चर्चा चालू होतो आणि हिच चर्चा जिल्ह्यात चालू आहे. राज्यात आणि जिल्ह्यात देशमुख परिवाराचा दबदबा आहे म्हणून दोन्ही खासदारांनी दिलीपराव देशमुख यांचकडून फेटा
बांधून घेतला नकार दिला नाही, मात्र याचा देशमुख परिवारातील आमदार असलेले धीरज देशमुख यांनी मात्र भर सभेत आणि भर स्टेजवर एका वयाने मोठा असलेल्या आणि माजी आमदार यांचा असा अपमान करणे कितपत योग्य आहे ? याचा सामान्य जनता नक्की विचार नक्की करत असेल…