महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज राज्यभरासह मुंबईत ‘आत्मक्लेश’ मूक आंदोलन करण्यात आले. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या झालेल्या दुर्घटनेनंतर शिवप्रेमींसह संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे. बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय
अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राज्यातील 13 कोटी जनतेची जाहीर माफी मागितली आणि आज राष्ट्रवादीच्यावतीने राज्यभर ‘आत्मक्लेश मूक आंदोलन’ करण्यात आले. मुंबईतील चेंबुर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आत्मक्लेश मूक आंदोलन करण्यात आले. तर दुसरे आंदोलन जुहू चौपाटी
येथे करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आणि मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ यांच्या सुचनेनुसार चेंबुर येथे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे तर जुहू चौपाटी येथे कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. चेंबुर येथे प्रदेश सरचिटणीस संतोष धुवाळी, प्रदेश प्रवक्ते
संजय तटकरे, दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ कांबळे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे,उत्तर मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष अर्शद अमीर, ज्येष्ठ नेते बापू भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार काटकर, महिला कार्याध्यक्षा आरती साळवी, प्रदेश प्रवक्त्या सना मलिक शेख, तर जूहू चौपाटी येथे ज्येष्ठ नेते दिनकर तावडे, जिल्हाध्यक्ष अजय
विचारे, महिला कार्याध्यक्षा मनिषा तुपे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या आंदोलनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.