अभिनेते रितेश देशमुख यांची राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाज महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवर तीन शब्दात प्रतिक्रिया

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुखने सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाज महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या धक्कादायक घटनेवर तीन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सिंधुदुर्गमधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील

छत्रपती शिवाज महाराजांचा पुतळा कोसळल्याची धक्कादायक घटना सोमवारी, 26 ऑगस्ट 2024 रोजी घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अवघ्या आठ महिन्यांपूर्वीच म्हणजेच 4 डिसेंबर 2023 रोजी या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. या सोहळ्याला राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांबरोबरच देशाचे संरक्षण मंत्रीही

उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतात नौदलाची स्थापना करणारे पहिले व्यक्ती असल्याने नौदल दिनाच्यानिमित्ताने या पुतळ्याचं पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आल होतं. मात्र हा पुतळा कोसळल्याने त्याच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित केली जात आहे. या प्रकरणावरुन आता राजकीय प्रतिक्रिया

समोर येत असतानाच नौदलानेही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. सदर ठिकाणाची पहाणी आता नौदल अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे. त्यातच आता मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रिटींकडूनही या घटनेवर प्रतिक्रिया समोर येत आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखनेही या

दुर्घटनेनंतर मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया नोंदवली आहे.
रितेश देशमुखने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन अवघ्या तीन शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. हात जोडणारा इमोजी वापरत रितेशने, ‘राजे माफ करा’ असं म्हटलं आहे.

Recent Posts