विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना पात्र विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचवा

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयांतर्गत असलेल्या विद्यार्थी लाभाच्या सर्व योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात, असे आवाहन शिक्षणाधिकारी (योजना) तृप्ती अंधारे यांनी केले. लातूर जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,

सहाय्यक योजना अधिकारी व विषय साधनव्यक्ती यांची आढावा बैठक दयानंद विज्ञान महाविद्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी त्या बोलत होत्या. या बैठकीमध्ये उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा प्रसार व प्रचार करणे, असाक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी करणे, एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती

योजना, राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना  यासारख्या विद्यार्थी लाभाच्या विविध योजनांचा तालुका स्तरावर सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. याप्रसंगी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूरचे सहायक शिक्षण संचालक डॉ. दत्तात्रय मठपती,

शिक्षण उपनिरीक्षक धनंजय सराफ सुद्धा उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. मठपती यांनी प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षितच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, शाळा सुरक्षा, सखी सावित्री कमिटी, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा 2, विद्यार्थी महावाचन चळवळ, यासारख्या महत्वाच्या  विषयांवर उपस्थितांशी संवाद

साधला. बैठक यशस्वी होण्यासाठी शिक्षणाधिकारी (योजना) कार्यालयातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सचिन मुंडे, दत्तात्रय थेटे, सतीश भापकर, सिद्धेश्वर आलमले, रवी कुलकर्णी, सुनीलकुमार सातपुते, दीपक चव्हाण, मकरंद कुदळे यांनी प्रयत्न केले.

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
16:23