महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – कॉक्लीअर इम्प्लांट ही कानाची जटिल आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया लातूर येथील गोरे कान, नाक आणि घसा हॉस्पिटलचे डॉ.आनंद गोरे आणि त्यांच्या टीमने यशस्वी केली आहे. लातूर शहर हे विवीध क्षेत्रात जोरदार प्रगती करत असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय क्षेत्रात लोकांना
उत्कृष्ट सेवा देणारे गोरे कान, नाक आणि घसा हॉस्पिटलचे डॉ.आनंद गोरे यांनी मेडिकल सायन्समध्ये अतिशय गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक समजली जाणारी “कॉक्लीअर इम्प्लांट” ही शस्त्रक्रिया मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर केवळ लातूर शहरात यशस्वी करण्याची किमया करणारे गोरे कान, नाक आणि घसा हॉस्पिटलचे
डॉ.आनंद गोरे आणि त्यांच्या टीमने यशस्वी केल्याबद्दल त्यांचे जिल्ह्यात आणि वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे. कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रियेत यश हे लातूरकरासाठी आणि गोरे हॉस्पिटल साठी अभिमानास्पद क्षण असल्याचे विवीध क्षेत्रातीला लोक वेक्त करत आहेत. कॉक्लीअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया, एक जटिल आणि दुर्मिळ
शस्त्रक्रिया आहे. कॉक्लीअर इम्प्लांट नावाचे एक यंत्र कानाच्या आत शस्त्रक्रिया करून बसवण्यात येते. या यंत्रामुळे आवाज मेंदूपर्यंत पोहचतो व मेंदूमध्ये बोलण्याचे स्पीच सेंटर (Speech Centre) विकसित व्हायला मदत होते. त्यामुळेच कॉक्लीअर इम्प्लांट हे जन्मतः कर्णबधिर असणाऱ्या नवजात बालकासाठी व त्यांच्या पालकांसाठी एक वरदानच बनले आहे.