NEET परीक्षेच्या गैरव्यवहारा बाबत लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगेचीं हाताची घडी तोंडावर बोट, अमित देशमुख साहेब खासदारांना चावी द्या…!

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – अहो माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख साहेब तुमच्या खासदार डॉ. शिवाजी कळगेनां चावी द्या म्हणजे ते या NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशीची मागणी करतील. नॅशनल टेस्टिंग

एजन्सी (NEET) तर्फे चार मे रोजी देशभरात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रियेबाबत अनेक तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत गैरप्रकार होणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी राज्य आणी देशभरातून होत असता दिसत आहे, पण लातूरचे नवनिर्वाचित खासदार

डॉ. शिवाजी काळगे यांनी या NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी सुद्धा केल्याची दिसत नाही. लातूर हे शिक्षणात खासकरून NEET परीक्षेत आपला वेगळा ठसा निर्माण करणारे लातूर पॅटर्न म्हणून ओळखले जाते, NEET परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे लातूरचे असतात, लातूर

हे डॉक्टर घडवणारी फॅक्ट्री म्हणून निवडणुकीच्या प्रचारात उल्लेख करून या डॉक्टर घडवणाऱ्या लातूर पॅटर्न साठी एक डॉक्टर खासदार असावा म्हणजे येथील विद्यार्थी यांचे प्रश्न ते सोडवतील असे आमित देशमुख प्रचारात सारखे म्हणत पण आता  NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी सुद्धा खासदार डॉ. शिवाजी

काळगे यांनी केली नाही हे दुर्दैव बहुतेक देशमुखांचा आदेश आला नाही म्हणून खासदार डॉ. काळगे यांनी या प्रकरणाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. आपल्या बाजूचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावीसरकारकडे केली आहे. कारण खासदार ओमराजे

निंबाळकर यांचा कोणी मालक नाही त्यानां कोणाला विचारायची किंवा परमिशन घेयची गरज नाही.
देशातल्या 571 शहरातील एकूण चार हजार 750 केंद्रावर 24 लाख सहा हजार 79 विद्यार्थ्यांपैकी 23 लाख 31 हजार 297 विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली. परीक्षेचा निकाल 14 जूनला अपेक्षित असताना संबंधित एजन्सीने

या परीक्षेचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला. परीक्षेत देशात 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स मिळाले आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय आहे. हरियाणातील एका केंद्रावरील प्रश्नपत्रिका उशिरा दिल्याचे कारण देऊन ग्रेस

मार्क दिल्यामुळे चार विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क मिळाले आहेत.व्यावसायिक परीक्षा सिस्टिम ऑफ एलिमिनेशनवर आधारित आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 718-719 असे गुण प्रदान करण्यात आल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याची शंका आहे. पालकांकडून व विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याबाबत विनंती करण्यात येत आहे.

Recent Posts