महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी) – लातूर येथील आर. जे. रॉयल अकॅडमी-CBSE, लातूर चा दरवर्षाप्रमाणे यावर्षीही 2023-24 ला बोर्डाच्या निकालात दबदबा दिसून आला आहे . राज्यात शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या लातूर पॅटर्नची यशस्वी निकालाची परंपरा चालू ठेवत लातूर येथील R. J. पवार सरांच्या रॉयल अकॅडमीने
या ही वर्षीच्या CBSC बोर्डाच्या परीक्षेत चांगला निकाल दिला आहे. रॉयल अकॅडमिच्या विध्यार्थ्यानी जास्त गुण मिळवत आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले आहे. अकॅडमीचा गणितामधील निकाल या वर्षीही अभिमानास्पद आहे. ॲकॅडमीमधे फक्त 55 विद्यार्थी इयत्ता 10 वी साठी होते. त्यातील 4 विदयार्थ्याना तब्बल
100/100 गुण मिळाले आहेत. तर 95 व पुढे 15 विद्यार्थी पेक्षा जास्त गुण घेणारे 23 विद्यार्थी आहेत,80 व पुढे 37 विदयार्थी आहेत.गणितामध्ये क्लासेसमधून तनिष्का पाटील (98.8%), संजना चव्हाण (96%), श्रेया आलमलेकर (95-6%), अमित स्वामी (94.6) या विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण घेतले तर ओजस
महिन्द्रकर (96.2%), प्रणव राठी (94.4%) यांनी 99 गुण घेतले आणि आयुशा पवार (98%), आयुष रामपुरे (97.2%) यांनी 98 गुण घेऊन अनुक्रमे 1 ला,2 रा, 3 रा येण्याचा बहुमान मिळवला. सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे आणि पालकांचा सत्कार आणि कौतुक अभिजीत देशमुख ( दिशा प्रतिष्ठान,लातूर), शिवाजीराव देशमुख
(संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती,लातूर), अमोल स्वामी सर (डायरेक्टर, गॅलक्सी डान्स अकॅडमी, लातूर) या प्रमुख पाहुण्यांनी आणि क्लासेसचे संचालक पवार आर.जे.सहकारी प्राध्यापक शरद देशमुख यांनी सन्मानचिन्ह, छत्रपती शिवरायांची मूर्ती देऊन केले. विदयार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभिजीत देशमुख ,
डायरेक्टर प्रो. पवार आर.जे सर , सहकारी शरद देशमुख आणि मोहिनी राहुल पवार यांच्या निकालाचे खूप कौतुकही केले.वाढत्या वयात पालकांनी विद्यार्थ्याचा मित्र होऊन त्यांना प्रत्येक वेळी समजून घेण्याची गरज आहे तसेच प्रत्येक मुलामधे वेगळा टॅलेंट असतो आणि त्याला पालकांनी चालना दिली पाहिजे असेही अभिजीत देशमुख
यांनी सांगितले .येणारी आव्हाने आणि पालकांनी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन अमोल स्वामी सर आणि प्रो.पवार आर.जे. यांनी केले. रॉयल अकॅडमी – 8, 5, 10 th CBSE, लातूर ने परत एकदा लातूर पॅटर्नची मान उंचावणारा निकाल दिला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी सुळ यांनी अगदी योग्यरितीने आणि मनोरंजनास्पद केले.