महाराष्ट्र खाकी ( बीड / विवेक जगताप ) – मराठा समाजाच्या या एकीची अनेकांना धडकी भरली आहे. त्यामुळे भल्याभल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत. याच कारणामुळे पंतप्रधान मोदी हे देखील सध्या महाराष्ट्रात गोधड्या घेऊन मुक्कामी आहेत. असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील बोलत होते. ते आष्टीच्या आंभोरा तालुक्यात
आयोजित संवाद बैठकीत बोलत होते. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील मराठा समाज एकत्र आला आहे. याची धास्ती देशाने घेतली आहे. राज्यात मराठा समाज एक झाला म्हणून लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यात घ्यावी लागली. अन्य राज्यात दोन टप्प्यात निवडणुका होत आहेत. हाच मराठा समजााचा विजय
आहे. भाजपला आमचा कधीही विरोध नव्हता. पण सरकारने आमच्या मायलेकीची डोकी फोडली. मी कोणालाही निवडून द्या, म्हटलं नाही. मात्र, या निवडणुकीत असे पाडा की पुढच्या पाच पिढ्या घरी बसल्या पाहिजेत. माझ्या गोरगरीब मराठ्यांना त्रास दिला तर पुढच्या दहा पिढ्या मराठे तुमच्या कपाळाला गुलाल लावणार नाहीत. दुसऱ्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका.