महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – सुधाकर शृंगारे यांना एका पत्रात डॉक्टर केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी! लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे हे कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असता, मग ते आपल्या भाषणातून आजी आमदारांना माजी म्हणलेले असो वा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना बावनसुळे म्हणलेले असो,
पण आता मागील काही दिवसापासून सुधाकर शृंगारे चर्चेत आहेत ते म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी शृंगारे यांना जाहीर भाषणात शृंगारपुरे असे म्हणून उल्लेख केला होता ही चर्चा शांत होत नाही तो पर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणखी एक पराक्रम करत कमी शिकक्षण असलेल्या सुधाकर शृंगारेंना डॉक्टर
सुधाकर शृंगारे म्हणून एक पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आता महायुतीचे घटक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या उमेदवाराचे नाव आणी त्यांचे शिक्षण माहित नसावे ही खूप गंभीर आणी दुःखाची बाब आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या शुभेच्छा पत्रातील डॉ. सुधाकर शृंगारे मुळे लातूर लोकसभा
मतदार संघातील मतदार चर्चा करत आहेत कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा धसका घेतला आहे, मतदारसंघात डॉ. शिवाजी काळगे यांची चर्चा असल्यामुळे आणी डॉक्टर बनवण्याची फॅक्ट्री असलेल्या लातूर लोकसभेचा महायुतीचा उमेदवार डॉक्टर असावा असेल वाटले असावे पण मुख्यमंत्री यांना
माहित असावे कि डॉक्टर कि मिळवण्यासाठी खूप मेहनत आणी आभ्यास करावा लागतो, असो पण कंत्राटदार असलेले सुधाकर शृंगारे यांना डॉक्टरकीचा मान मुख्यमंत्री यांच्या अज्ञाणत्यामुळे मिळाला.