Goldi barar गोल्डी बरारच्या हत्येची बातमी खोटी

महाराष्ट्र खाकी ( विवेक जगताप ) – 1 मे रोजी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये पंजाबी गायक सिद्धू मूसवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी बरार चा खून झाल्याचा दावा करण्यात आला होता. गोल्डी बरारची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे बोलले जात होते, मात्र अमेरिकन पोलिसांनी गोल्डी बरारच्या हत्येचा दावा

फेटाळून लावला आहे. फ्रेस्नो पोलीस विभागाने ही बातमी खरी नसल्याचे सांगितले. फेअरमॉन्ट हॉटेलमध्ये तरुणांवर गोळ्या झाडण्यात आल्या अमेरिकन (US) पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे – कॅलिफोर्नियातील फ्रेस्नो येथील फेअरमाँट आणि होल्ट एव्हेन्यू येथे बुधवारी झालेल्या भांडणानंतर ज्या दोन लोकांना गोळ्या घातल्या

गेल्या, त्यापैकी एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव 37 वर्षीय झेवियर गॅल्डनी असे आहे. “अमेरिका पोलिसांनी सांगितले की गोल्डी बरारच्या हत्येची बातमी अजिबात खरी नाही. ही चुकीची माहिती इंटरनेट मीडिया आणि ऑनलाइन न्यूज एजन्सींवर पसरवली जात आहे.”

Recent Posts