Latur loksabha आजी आमदारांना माजी आमदार करणाऱ्या सुधाकर शृंगारेना स्वतःच्या घराचा आणी कार्यालयाचा पत्ता निट माहित नाही

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – लातूर लोकसभेचे(BJP) भाजपा महायुतेचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना त्यांच्या घराचा पत्ता माहित नसल्याचे काही गोष्टीमधून दिसून येत आहे तर ज्या उमेदवाराला स्वतःच्या घराचा पत्ता ठीक माहित नाही त्या उमेदवाराकडून मतदासंघाच्या विकासाची अपेक्षा काय ठेवावी असे लातूर

लोकसभा मतदारसंघातील मतदारांना वाटत आहे. सुधाकर शृंगारे हे मतदारसंघातील विकासकामामुळे चर्चेत किंवा त्यांची ओळख नाही तर त्यांच्या व्यवसायामुळे, त्यांच्याकडे असलेल्या भरपूर पैशा मुळे आणी आपल्या अतरंगी भाषणामुळे निर्माण झाली आहे. लातूर मधील प्रचार सभेत एका भाषणात त्यांनी महाराष्ट्र भाजपा

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव बावनसुळे म्हणून उल्लेख केला तर स्टेजवरील सर्व विद्यमान आमदार आणी मंत्र्यांना माजी आमदार असा उल्लेख करून सर्वाना आश्चर्यचकित केले, पण ही सर्व घटना नेत्यानी आमदारानी , मंत्र्यांनी आणी विशेषतः प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सर्व हसण्यावर घालवले आणी प्रसंग

निभाऊन नेला, पण सुधाकर शृंगारे यांची सर्व मतदारांना आणी नागरिकांना कमाल वाटली कि या भाषणाच्या वेळी आजीला माजी आणी बावनकुळे यांना बावनसुळे म्हणत होते तेव्हा शृंगारे यांच्या मागे बसलेले लातूरचे माजी आमदार शिवाजीराव कव्हेकर पाटील यांनी त्यांना हात लावून सांगण्याचा प्रयत्न केला पण सुधाकर शृंगारे ते

शृंगारेच ते काही थांबले नाहीत आणी आपले भाषान वाचत राहिले, इतपर्यंत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणी नेत्यांनी समजून घेतले पण आता तर सुधाकर शृंगारे यांना लातूर मधील त्यांच्या घराचा पत्ताच निट माहित नसल्याचे दिसून येत आहे, कारण शृंगारे यांनी त्यांच्या विकासपर्व या पुस्तकावर त्यांच्या लातूर निवास आणी ऑफिस चा पत्ता

हा पाखरासांगवी असा केला आहे आणी नॅशनल पोर्टल ऑफ इंडिया या संकेतस्थळावर खडगाव ( खाडगाव ) असे दिसून येत आहे इतकेच काय तरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विकासपर्व पुस्तकाला दिलेल्या शुभेच्छा पत्रावर शृंगारे यांचा पत्ता खडगाव ( खाडगाव ) असा उल्लेख आहे. या सर्व गोष्टी मतदारांच्या समोर येत

असताना नागरिक आणी मतदार चर्चा करत आहेत कि ज्या उमेदवाराला आपल्या घराचा पत्ता निट माहित नाही कोणता नेता,मंत्री,आमदार आजी आहे का माजी आहे हे कळत नाही त्या उमेदवाराकडून विकासाची अपेक्षा कशी करणार आणी लातूर लोकसभा मतदार संघाची निट माहिती कशी ठेऊन संसदेत मतदारसंघातील प्रश्न कसे मांडणार असा प्रश्न नागरिक आणी सामान्य मतदारांना पडला आहे .

Recent Posts