खासदार सुधाकर शृंगारे साहेब मतदारांना विकास कामे नाहीत तर कमीत कमी तुमचे “लातूर लोकसभा विकासपर्व” पुस्तक तरी द्या

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाचा आढावा दाखवणारे “लातूर लोकसभा विकासपर्व” पुस्तक फक्त नेत्यापार्यंतच पोहचले मतदारांना ना विकास दिसला ना “लातूर लोकसभा विकासपर्व”  पुस्तक ! मराठवाड्यातील वेगाने विकसित होणारा जिल्हा

म्हणून लातूरची ओळख आहे. लातूर लोकसभा मतदार संघाचे मागील पाच वर्षी प्रतिनिधीत्व करणारे सुधाकर श्रृंगारे यांनी आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात मतदार संघाच्या विकासासाठी आणि लोकहितासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे मतदारांना भासवत होते का असा प्रश्न मतदारांना पडला आहे कारण “लातूर लोकसभा

विकासपर्व” हे पुस्तक 99% मतदारापर्यंत पोहचलेच नाही . सुधाकर श्रृंगारे यांच्या खासदारकीच्या कार्यकाळात लातूरल लोकसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल मतदारांना देण्यासाठी शृंगारे यांनी “लातूर लोकसभा विकासपर्व” नावाचे पुस्तक छापले पण हे “लातूर लोकसभा विकासपर्व” पुस्तक मतदारापर्यंत म्हणजे

जनतेपर्यंत पोहचलेच नाही हे पुस्तक फक्त देशातील आणी राज्यातील भाजपाच्या प्रमुख नेत्यापर्यंत पोहचले यामुळे मतदार म्हणत आहेत कि खासदार मागील पाच वर्षात मतदारसंघात सण, उत्सव आणी जयंत्या साजऱ्या करण्यासाठीच येत होते मग या “लातूर लोकसभा विकासपर्व” पुस्तकात कोणते विकास कामे दाखवली

आहेत. मतदारांना प्रत्यक्षात विकास कामे काही दिसले नाहीत कमीत कमी पुस्तकातून तरी मतदारसंघाचा विकास दिसेल अशी अपेक्षा होती पण खासदार शृंगारे यांनी इथेही मतदारांना निराश केले. “लातूर लोकसभा विकासपर्व”  पुस्तकात भाजपाच्या केंद्रीय, राज्य आणी जिल्ह्यातील नेत्यांनी सुधाकर शृंगारे यांच्या या अभिनव उपक्रमाचे

कौतुक करत केलेले काम जनतेपर्यंत पोहचेल अशा शुभेच्छा दिल्या पण शृंगारे यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, संभाजी पाटील निलंगेकर, अभिमन्यू पवार, रमेश आप्पा कराड या सर्वाना निराश केले असे म्हणावे लागेल,

Powered by the Tomorrow.io Weather API
Recent Posts
23:50