जे जे नवं ते लातूरला आणायचे असेल तर काँगेस, महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्लीत पाठवणे गरजेचे – आमदार धिरज देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – जे जे नवं ते लातूरला आणायचे असेल तर काँगेस, महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्लीत पाठवणे गरजेचे आहे असे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनीलातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आणी लोक संवाद  मेळाव्यात

म्हणाले, लातूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने लातूर तालुक्यातील भातांगळी व बोरी पंचायत समिती गणातील विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी लातूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे आणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला. जे जे नवं

ते लातूरला आणायचे असेल तर काँगेस, महाविकास आघाडीचा उमेदवार दिल्लीत पाठवणे गरजेचे आहे. लातूर शिक्षणात अग्रेसर आहे त्यामुळे लातूरला एम्स , आयआयएम , आयआयटी सारख्या संस्थांसाठी पुढाकार घ्यायला हवा असे धीरज देशमुख म्हणाले . काँगेस, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. काळगे यांचे वैद्यकीय

क्षेत्रात चांगले नाव आहे. त्यांनी 25 वर्षे रूग्णसेवा केली आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्र व लातूरकरांच्या प्रश्नाला ते योग्य न्याय देतील आणि लातूर व मराठवाड्याचे नाव उंचावतील, हा विश्वास आहे. यासाठी आपण सर्वांनी बहुमताने विजयी करण्याचा निर्धार करावा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज देशमुख यांनी मतदारांना केले.

Recent Posts