भाजपने महिलांसाठी केलेले काम पाहून भाजपात प्रवेश केला, मला आता राजकारणात काम करायचं आहे – डॉ. अर्चना पाटील चाकूरकर

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / विवेक जगताप ) – माजी केंद्रीय गृहमंत्री लोकसभा सभापती तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या (स्नुषा) सुनबाई डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांनी ( दि. 30 ) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबईतील भाजप कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या कि भाजपात प्रवेश करण्यात कोणतेही कारण नाही, मला फक्त काम करायचं आहे अस त्या म्हणाल्या, मी तिस वर्षी सामाजिक काम केले आहे आणी आता राजकारणात काम करायचं आहे म्हणून मी भाजपात प्रवेश केला . मी काँग्रेस मध्ये

कोणतेही पदावर नव्हते त्यामुळ काँग्रेस सोडायचा प्रश्नच येत नाही हा तर माझ्या राजकारणाचा श्री गणेश आहे, आणी भाजपा सरकारने महिलांसाठी केलेल्या काम पाहून आणी महिलांना सर्वत्र काम करण्यात समानता मिळते म्हणून मी भाजपात प्रवेश केला अस डॉ. अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या.

Recent Posts