सुधाकर शृंगारे यांना भाजपाच्या गटबाजी आणी वर्चस्वाच्या राजकारणाचा फटका बसणार !

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप  ) – लातूर जिल्हा भाजपा मधील गटबाजी आणी वर्चस्वाच्या राजकारणाचा सुधाकर शृंगारे यांना बसणार फटका, रमेश आप्पा कराड यांच्या नेतृत्वात लढलेल्या बाजार समिती निवडणुकीत जसे गटबाजी मुळे अपयश आले तसे अपयश मिळेल का  ? सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीची

धाम – धूम चालू आहे याच अनुषंगाने लातूर लोकसभा मतदारसंघात भाजपा कडून दुसऱ्यांदा सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी मिळाली आहे, शृंगारे यांना उमेदवारी मिळवून देण्यात आणी त्यांच्या प्रचाराच्या सभेच्या आणी मेळाव्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा लातूर भाजपा मधील अंतर्गत गटबाजी आणी वर्चस्वाची लढाई दिसून येत आहे.

2019 च्या निवडणुकीत शृंगारे यांच्या निवडणुकीची सर्व जिम्मेदारी निलंगेकर यांनी समर्थपणे निभावली होती आणी शृंगारे यांचा विक्रमी मतांनी विजय मिळवला होता. पण या निवडणुकीत निलंगेकरांची जागा रमेश आप्पा कराड यांनी घेत्याचे दिसत आहे आणी निलंगेकर कुठेतरी नाराजी असल्यामुळे बॅकफुटवर गेले आहेत असे साध्यचे

चित्र आहे.  काल झालेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा आणी, सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ कार्यक्रम भाजपा नेते आ. रमेश आप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली लातूर येथील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात गुरुवारी झाला या कार्यक्रमाच्या बॅनर वर संभाजी पाटील निलंगेकर आणी

औसा चे आमदार अभिमन्यू पवार याचे नाव मोठ्या अक्षरात होते पण कार्यक्रमात मात्र ते दिसलेही नाहीत आणी त्यांच्या कार्याचा किंवा त्यांचा उल्लेख ही नाही केला. यातूनच लातूर भाजपा मधील गटबाजी आणी वर्चस्वाचे राजकारण लोकांना दिसत आहे. म्हणून भाजपा पदाधिकारी आणी कार्यकर्ते यांच्या मनात ” कोणता नेता

मानू..! ” असा गोंधळ चालू झाला आहे. जिल्हाच्या आणी राज्याच्या राजकारणात सक्रीय असलेल्या निलंगेकारांना बगल देत सुधाकर शृंगारे आणी रमेश आप्पा कराड यांनी एकला चालो रे असे मानलेले दिसत आहे. पण या सर्वांचा फटका सुधाकर शृंगारे यांना नक्कीच बसेल..!

Recent Posts