महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – 16 व्या लोकसभेतील उच्च शिक्षित मा.खासदार प्रो. डॉ सुनील गायकवाड यांना द जॉर्ज वॉशिंग्टन यूनिवर्सिटी ऑफ पिस यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (यूएसए) कडून मानद डॉक्टरेट जाहीर झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. लातूर लोकसभेत अनेक विकासकामे केलेली नोंद घेऊन
प्रामुख्याने रेल्वे बोगी निर्मिती कारखाना, एक ट्रेन ते 21 ट्रेन सुरु केले, लातूर रेल्वे स्टेशन वर सर्वात मोठा वेटिंग हॉल,हिंदी लायब्ररी, व्हीआयपी लाउंज,पासपोर्ट कार्यालय,200 बेड चे सुपरस्पेशिलिटी हॉस्पिटल, नीट परिक्षा सेंटर, पोस्टऑफिस चे विभागीय कार्यालय, रत्नागिरी – नागपूर हायवे,लोकसभेत मतदार संघातील अनेक प्रश्न मांडले,
आदी कामांची दखल घेऊन द जॉर्ज वॉशिंग्टन यूनिवर्सिटी ऑफ पिस यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका कडून मानद डॉक्टरेट पीएच.डी.(पॉलिटिकल साइंस) ही मानद पदवी जाहीर झाली आहे. 24 जानेवारी 2024 रोजी दिल्ली येथे एका विशेष पदवी दान सभारंभात देण्यात येणार आहे.
डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना यापूर्वी अनेक पीएचडी, डीएससी, पदव्या त्यांना मिळाल्या आहेत. त्यांच्या या मानद डॉक्टेर बद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.