महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – आमदार अभिमन्यू पवार यांना अयोध्येतील रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील गोविंदगिरी महाराजांच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास
सांगितला हे दिसले नाही. अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला . त्यानंतर, प्रभू श्रीरामांच्या भव्य दिव्य मंदिराचे लोकार्पण झाले. पंतप्रधान मोदींच्या भाषणापूर्वी गोविंदगिरी महाराजांनीही व्यासपीठावरुन भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी
महाराजांचा उल्लेख करत तप करणे ही भारतीय संस्कृतीची परंपरा राहिली आहे. आज या ठिकाणी मला एका राजाची आठण होत आहे, ज्यात हे सर्व गुण होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज लोकांना कदाचित माहीत नाही, ते स्वतः मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी श्रीशेलम येथे गेले, तेव्हा त्यांनी तीन दिवसांचा
उपवास केला. तीन दिवस शिवमंदिरात राहिले. महाराजांनी त्यावेळी सांगितले की, मला राज्य नाही करायचे मला सन्यास घेऊन भगवान शिवाची सेवा करायची आहे. पण त्यांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी त्यांची समजूत घातली आणि राज्य करणे ही त्यांची सेवाच आहे, असे सांगितले, असे गोविंदगिरी यांनी आपल्या भाषणात
वक्तव्य केले यावरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला म्हणून गोविंदगिरी महाराजावर वेगवेगळ्या स्तरातून टिका होत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे विश्वासू आणी लाडके आमदार अभिमन्यू पवार यांनी गोविंदगिरी यांच्या भाषणाचा अर्धा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंट
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩#RamMandirPranPrathistha pic.twitter.com/bx8qUV2ORp
— Abhimanyu Pawar (@AbhiPawarBJP) January 22, 2024
वर शेअर करत छत्रपती शिवाजी महाराज कि जय..! केला, पण गोविंदगिरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चुकीचा इतिहास सांगितला याबद्दल चकार शब्द काढला नाही यामुळे मराठा समाज आणी छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानणारे आश्चर्य आणी रोष वेक्त होत आहे. आमदार अभिमन्यू पवार यांना छत्रपती
शिवाजी महाराज यांचा सांगितलेला चुकीच्या इतिहास चालतो का ? असा प्रश्न त्यांच्या मतदारसंघातील मराठा समाजात आणी छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा वर्ग विचारत आहे !