महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – OBC महिला मोर्चा लातूर शहर जिल्हा अध्यक्ष हेमा येळे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त लातूर शहर कार्यालयात पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा केला. हेमा येळे यांच्याकडे OBC महिला मोर्चाची जबाबदारी आल्यापासून विवीध कार्यक्रम राबवून जनसंपर्क आणी
भाजपाचे विचार आणी कार्य जनते पर्यंत पोहचवण्याचे कार्य होत असताना दिसत आहे. हल्ली प्रत्येक व्यक्ती स्वत:चा विचार करून दुसऱ्याच्या वाट्याला आलेले सुख सुध्दा आपल्या पदरी कसे पडणार यासाठी चढाओढ करताना दिसतो. मात्र अशाही जगात काही मूठभर माणसे समर्पित व नि:स्वार्थ भावनेने आपण समाजाच काही देणं
लागतो या भावनेतून संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात. अशाच महानुभवांचा सन्मान सोहळा काल ( दि.6 जानेवारी ) शनिवारी भारतीय जनता पार्टी गांधी चौक कार्यालय येथे ओबीसी जिल्हा अध्यक्ष हेमाताई येळे यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना शाल, फुल, पेन आणि डायरी देऊन गौरविण्यात आले या वेळी
कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधव बांधव विनोद कांबळे, विशाल लामतुरे, रोहिणी ताई देशमुख, रंगनाथ मामा बंडगर, यशवंत पवार, संजीव पाटील, पत्रकार उपस्तित होते तसेच हेमा येळे ओबीसी महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष लातूर शहर, भाजपा पार्टीचे ओबीसी
अध्यक्ष अजय भूमकर ओबीसी, सरचिटणीस वैभव बनारसे, महिला मोर्चा सरचिटणीस प्रगती डोळसे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळ अध्यक्ष जयश्रीताई भुतेकर, महात्मा बसवेश्वर मंडळ कार्यालय कार्यालय प्रमुख संजय निराधार कमिटी सदस्या लताताई घायाळ महिला, मोर्चाच्या अध्यक्ष महिला मोर्चाचे अध्यक्ष रोहिणी ताई, देशमुख व इतर पद अधिकारी उपस्थित होते