महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त लातूर येथील भारतीय जनता पार्टी गांधी चौक येथील पक्ष कार्यालयात अभिवादन करून जयंती साजरी करण्यात
आली. भारतात स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या आद्यशिक्षिका आणि महान समाजसेविका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज लातूर येथील भारतीय जनता पार्टी गांधी चौक
येथील पक्ष कार्यालयात अभिवादन करण्यात आले त्यावेळी ओबीसी महिला मोर्चा अध्यक्षा हेमा येळे , काकासाहेब चौगुले, रोहिदास वाघमारे सर, शोभाताई कोंडेकर, प्रगती ताई डोळसे, रत्नमाला ताई घोडके ,
जयश्री भुतेकर, रुक्मिणी ताई वाघमारे, ज्योतीताई मारकडे, सुनील डोळसे.आदी उपस्थित होते.