महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (स्थापत्य) झालेल्या कनिष्ठ अभियंता साठी घेण्यात आलेल्या 16 डिसेंबर च्या दिवशीच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये जाफर शेख यांच्या COSS या परीक्षा केंद्रातील रमीज शेख आणी अनिस शेख यांनी विद्यार्थ्याला चिट दिल्याचे पोलीस FIR मध्ये
नोंद, लातूर शहरातील बार्शी रोडवरील बिडवे कॉलेज च्या बाजूला असलेल्या जाफर शेख यांच्या COSS या ऑनलाईन परीक्षा केंद्रावरील यंत्रणेतर्फे उत्तर पुरविल्या गेल्याचा भीषण प्रकार घडला असल्याचे विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत म्हटले होते , लक्ष्मण देवकर उपविभागीय अभियंता सार्वजनिक
बांधकाम उपविभाग उदगीर यांनी या सर्व प्रकारा बाबत दिलेल्या तक्रारीवरून MIDC पोलीस स्टेशन मध्ये FIR नोंद झाली आहे. या FIR मध्ये रमीज शेख आणी अनिस शेख यांनी एका विद्यार्थ्यास चिट दिल्याचे COSS या परीक्षा केंद्रातील CCTV रेकॉर्ड मध्ये दिसून आले आहे असे नमूद केले आहे. जाफर शेख यांच्याकडून आपल्या
COSS या शिक्षण संस्थेचे नाव बदनाम होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यासोबत आर्थिक देवाणघेवाण केली अशी दाबक्या आवाजात चर्चा सुरु आहे! या सर्व प्रकारवरून गरीब विद्यार्थी आभ्यास करून परेशान होतात आणी पैसे वाल्यांची सोय होते असे दिसून येत आहे, तरी या गंभीर प्रकरणी जिल्हाधीकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी
गांभीर्याने लक्ष देऊन COSS सारख्या संस्था वर कायमची बंदी घातली पाहिजे किंवा काळ्या यादीत टाकले पाहिजे असे मत नागरिक वेक्त करत आहेत, नागरिकांच्या भावनांचा आदर करत जिल्हाधीकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालतील का ? आणी COSS या संस्थे वर कडक कारवाई करतील का ?