महाराष्ट्र खाकी ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – लातूर येथे मंजूर असणारे जिल्हा ग्रामीण रूग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्य मंञी डाॅ.तानाजी सावंत यांनी दिले आहेत.याशिवाय लातूर येथील सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे खाजगीकरण थांबविण्याचा निर्णयही घेण्यात आला असून आता राज्य
शासनामार्फत हे रूग्णालय चालविले जाईल,अशी माहिती माजी पालकमंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले. ” माझं लातूर ” परिवाराच्या वतीने दि. 2 आॅक्टोबर पासून सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे खाजगीकरण थांबविण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण करण्यात आले होते. लातूरच्या हक्काचे व मंजूर
असणारे आले होते.लातूरच्या हक्काचे व मंजूर असणारे जिल्हा ग्रामीण रूग्णालय लवकरात लवकर सुरू करावे,अशी मागणीही करण्यात आली होती.सरकारचा प्रतिनिधी म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची
विनंती केली होती.या प्रश्सासंदर्भात बैठक घेऊन विषय मार्गी लावण्यासाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राज्याचे आरोग्यमंञी डाॅ.तानाजी सावंत यांच्याशी पञव्यवहार केला होता.त्यानुसार मंगळवारी दि.12 डिसेंबर रोजी नागपूर येथे आरोग्यमंञ्यांच्या दालनात बैठक झाली.आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर
यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी आरोग्य मंञी डाॅ.तानाजी सावंत यांनी लातूरला मंजूर असणारे जिल्हा ग्रामीण रूग्णालय लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.सुपर स्पेशालिटी रूग्णालय आता शासनच चालवेल.त्याचे खाजगीकरण
होणार नाही,असे आश्वासनही आरोग्य मंञ्यांनी दिले आहे.त्यामुळे लातूरच्या हक्काचे जिल्हा ग्रामीण रूग्णालय लातूरकरांना लवकरच मिळणार असल्याची माहिती आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिली.सुपर स्पेशालिटी रूग्णालयाचे खाजगीकरण होणार नसल्याने सामान्य जनतेला पूर्वीप्रमाणेच या रूग्णालयातून उपचार मिळणार असल्याचेही आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले.