महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर येथील प्रसिद्ध असलेल्या ब्रिज रेस्टोरंट मधील प्रत्येक टेबलवरील स्टॅण्डी (चार्ट ) वरील हॉटेलच्या पत्त्यावर फक्त शिवाजी चौक असे लिहिले होते ही बाब लातूर जिल्ह्यातील कट्टर मराठावादी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे भक्त असलेले ऋषिकेश कदम आणि समाजसेवा आणि
पत्रकार सचिन सोळुंके यांच्या निदर्शनास आल्यावर या बाबतीत वेवस्तीत पाहणी केली आणि ही बाब ब्रिज रेस्टोरंटच्या मॅनेजमेंटच्या लक्षात आणून दिली आणि चार्टवर छत्रपती शिवाजी महाराज चौक असे लिहिण्याच्या सूचना आणि विनंती केली, ऋषिकेश कदम आणि सचिन सोळुंके यांच्या सूचनेची आणि विनंतीची गंभीर दाखल
घेऊन ब्रिज रेस्टोरंट कडून झालेली चूक सुधारून छत्रपती शिवाजी महाराजांचा होत असलेला एकेरी उल्लेख आणि होत असलेला अवमान थांबवला , राज्यभरात विवीध रस्त्यांना आणि चौकांना महापुरुषांचे नावे दिली आहेत, पण या महापुरुषांचे नावे एकेरी आणि अर्धवट होत असल्यामुळे महापुरुषांचा अवमान होत होता ही बाब
लक्षात घेऊन जागरूक नागरिकांनी आणि प्रशासनाने विवीध रस्ते आणी चौक यांना असलेल्या महापुरुषांचे नाव सर्व आस्थापणे आणी सर्व कागद पत्रावर पूर्ण लिहिण्याच्या सूचना आणी आवाहन केले होते, लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील ब्रिज रेस्टोरंट काडून याचे पालन करण्यात आले नव्हते ब्रिज
रेस्टोरंट कडून प्रत्येक टेबलवर हॉटेलची माहिती असलेले मिनी चार्ट ठेवण्यात आले होते त्यावर हॉटेलचे नाव पूर्ण होते पण पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक असे न लिहिता फक्त शिवाजी चौक असे लिहिले होते, ही बाब ऋषिकेश कदम आणी सचिन सोळुंके यांच्या लक्षात येताच हॉटेल मॅनेजमेंट च्या लक्षात आणून दिली आणी हॉटेल
मॅनेजमेंट काडून झालेली चूक सुधारली आणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा होत असलेला अवमान थांबला, याबद्दल ऋषिकेश कदम आणी सचिन सोळुंके मराठा समाजातून आणी शिव भक्तांकडून कौतुक होत आहे.