महाराष्ट्र खाकी ( उदगीर / प्रतिनिधी ) – तुळशीदास बिरादार लिखित “ माणुसकीच्या शत्रू संगे” “खेळ मांडला “ या दोन नाटकाच्या पुस्तकांचे प्रकाशन लातूर चे माजी खासदार संसद रत्न प्रो. डॉ सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी बोलताना मा. खासदार डॉ. सुनील गायकवाड म्हणाले की नाटकाची
पुस्तके वाचून समजण्यापेक्षा त्याचे प्रयोग झाले पाहिजेत. मराठवाडा मुक्ती संग्राम चे चित्रण नाटकाच्या माध्यमातूम लिहण्याचे काम तुलसीदास बिरादार यांनी उत्तम केले आहे. नाट्यचळवळ ही खेड्या पाड्यातून सुरूच राहिली पाहिजे पूर्वी खेड्या गावात अनेक नाटकाचे प्रयोग होत असत तसे पुन्हा सुरु झाले पाहिजेत. नाट्य परिषद चे काम
चागले सुरु आहे असे ही म्हणाले. कार्यक्रमाला लातूर जिल्हा नाट्यपरिषदेचे अध्यक्ष ऍड.शैलेश गोजमगुंडे, प्रसिद्ध कवी भारत सातपुते, प्रा.सुदर्शन बिराजदार, व्यंकटराव पन्हाळे, सतीश शिंधाळकर, प्रमोद पवार, सौ सुकुमारताई लोकरे, लक्ष्मण जोंधळे, विठ्ठलराव दराडे, बळीराम चव्हाण, लक्ष्मन खताल, गोविंद हंदराले, सुनीता
चौशास्टे, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तानाजी महाराज दाडगे, शिवांनंद भुसारे, धम्मपाल निचले आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि गावकरी मोठ्या संखेनी उपस्थित होते.