महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी औसा येथे बोलताना पुन्हा एकदा भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटात जेवणारी लोकं मराठ्यांविरोधात बोलत आहेत, त्यांना आवरा अन्यथा सामना आमच्याशी
आहे, असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी दिलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेनंतर भाजपकडून आमदार नितेश राणे मराठा असून पण त्यांनी पक्षनिष्ठा आणि वेक्तीनिष्ठा दाखवत तुम्ही देवेंद्र फडणवीसांवर टीका केली तर आम्ही सहन करणार नाही, असं म्हणत नितेश राणेंनी मनोज जरांगे पाटलांना खडसावलं आहे. पण देवेंद्र
फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे स्विय सहाय्यक राहिलेले आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने आमदार झालेले अभिमन्यू पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोपाला (टिकेला) आणखी उत्तर दिले नाही कि चकार शब्द बोललेले नाहीत याचे आश्चर्य मतदारसंघात आणि बीजेपी
च्या गोटात होत आहे. मागील काळात फडवणीस यांनी बोलतानाम्हणाले होते कि मी ब्राम्हण आहे म्हणून मला टार्गेट केले जात आहे तेव्हा आमदार अभिमन्यू पवार यांनी एका समाज माध्यमाला मुलाखत देऊन फडणवीस कसे जातीनिरपेक्ष आहेत याचे अनेक बाहेरील आणि घरातील उदाहरण देऊन आपले मत वेक्त करून फडणवीसांचे
समर्थन दाखवले होते. पण मनोज जरांगे पाटील यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या बालेकिल्ल्यात येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केले तरी आमदार अभिमन्यू पवार गप्प का आहेत अशी चर्चा जोरात सुरु आहे. आमदार अभिमन्यू पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा जात आणि मराठा जातीचे
मत महत्वाचे वाटत आहेत का ? का आता आमदार अभिमन्यू पवार यांना देवेंद्र फडणवीस यांची गरज नाही ? स्वतःपेक्षा देवेंद्र फडणवीस यांना मानणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांना मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस याच्यावरील आरोप मान्य आहेत का ? असे अनेक प्रश्न आमदार अभिमन्यू पवार यांच्या गप्प
राहण्यामुळे भाजपा कार्यकात्यांच्या आणि वरिष्टांच्या मनात निर्माण झाले असतील यात शंका नाही! मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपाला कोकणातील आमदार नितेश राने प्रतिउत्तर देत असतील तर पवारांच्या बालेकिल्ल्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर झालेल्या आरोपाला आमदार अभिमन्यू पवार काही बोलले नाहीत
या गोष्टींचा विचार देवेंद्र फडणवीस नक्की करतील, कारण देवेंद्र फडणवीस हे मुरलेले राजकारणी आहेत ते बोलून नाही तर करून दाखवतात असा त्यांचा इतिहास आहे. जर देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अभिमन्यू पवार यांच्या या वागण्याचा विचार केला तर अभिमन्यू पवारांना याचा फटका आगामी विधासभा निवडणुकीत नक्की
बसेल! आमदार अभिमन्यू पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांची आंदोलन स्थळी जाऊन भेट घेतल्याने देवेंद्र फडणवीस नाराज आहेत अशी सुप्त चर्चा बीजेपी च्या गटात होती आणि तशा बातम्या पण समोर आल्या होत्या आता अभिमन्यू पवार यांच्या या गप्प राहण्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची नाराजी आणखी वाढते का ते पुढील काळात दिसून येईल.