मनोज जरांगे पाटील यांच्या निलंगा येथील सभेला दिड लाख सकल मराठा बांधव येणार..

महाराष्ट्र खाकी – ( निलंगा / प्रशांत साळुंके ) – निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या प्रांगणावर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची तयारी मोठ्याप्रमाणात चालू आहे.आज (दि.9) सायंकाळी निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालय प्रांगणावर सायंकाळी सात वाजता भव्य सभा संपन्न होणार असून सभेला दिड लाख सकल मराठा

बांधव उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले असल्याचे येथील विश्रामगृृहावर आयोजित पञकार परिषदेत आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांचे निलंगा नगरीत आगमन होताच उदगीरमोड येथे दलित बांधवांच्या वतीने,जिजाऊ चौकात लिंगायत बांधवांच्या वतीने तर छञपती शिवाजी महाराज

चौकात मुस्लिम समाज डाॅक्टर व वकील मंडळी यांच्या वतीने त्यांचा सत्कार होणार आहे. छञपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहुन 21 बैलगाडीच्या रॅलीतून ज्यांचे सारथ्य महिलांच्या हाती असेल एका बैलगाडीत मनोज जरांगे पाटील असतील,छञपती शिवाजी महाराज ते सभेच्या ठिकाणी बैलगाडीतून

पुष्पवृष्टी करत मनोज जरांगे पाटील यांचे आगमन होईल. विचारपीठावर पाच मुलींच्या हस्ते त्यांचे स्वागत होईल.त्यानंतर सर्व जातीधर्मातील प्रतिनिधींच्या वतीने पाठिंबा पञ देण्यात येतील.स्टेजच्या डाव्या बाजूला महिला व विद्यार्थी यांची बसण्याची व्यवस्था उजव्या बाजूला पुरूषांसाठी बसण्याची व्यवस्था,सभेच्या ठिकाणी आठ

स्क्रीन बसविण्यात येणार आहेत. सभेच्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना पाणी आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे. सभेच्या सर्व बाजूंनी मोबाईल व्हॅन दवाखान्याची व्यवस्था करण्यात आली आहे.त्याचबरोबर औराद शहाजानी, निटूर, अंबुलगा येथून येणार्‍या वाहनासाठी जिजाऊ चौकातून दापका वेसीकडे जाणार्‍या रस्त्यावरील आदर्श

विद्यालय व जनावरांचा बाजार भरणार्‍या मैदानात पार्किंग व्यवस्था, कासारशिरसी व मदनसुरी कडून येणार्‍या वाहनांना जुने मार्केट यार्ड मैदानावर पार्किंग, पानचिंचोली, मसलगा, हाडगा येथून येणार्‍या वाहनांना बाजार समितीच्या मैदानात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.महिलांसाठी खास पाच वाजेपर्यंत येणार्‍या वाहनांना

महाराष्ट्र इंजिनिअरींग काॅलेजच्या पाठिमागील मैदानात पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास दोन हजार स्वंयसेवक व तीनशे स्काऊट गाईडचे विद्यार्थी व्यवस्थेसाठी राहणार आहेत.कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना सभेच्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून येता येणार आहे.त्यांना कोणीही विरोध करणार नाही असे

आयोजकांनी सांगितले.तर सायंकाळी पाच वाजेपासून शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांच्या शाहीरीचा कार्यक्रम सुरू होणार आहे.मनोज जरांगे पाटील सभेला सर्व जातीधर्मातील नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आहे. या पञकार परिषदेला ईश्वर पाटील,चक्रधर शेळके,विशाल

जोळदापके,विनोद सोनवणे,रमेश लांबोटे, विलास लोभे, बबन राजे, आंबादास जाधव,राजकुमार साळुंके, प्रकाश गोमसाळे, सुरेंद्र जाधव, किरण पाटील, प्रमोद कदम, जगदीश लोभे, भरत चव्हाण, अजित लोभे आदी जणांची उपस्थिती होती.

Recent Posts