महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – औसा येथे क्रिएटिव्ह फाऊंडेशन व औसा महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आणि पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग व उमेदच्या सहकार्यातून औसा येथील विजय मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय “स्वयंरोजगार
निर्मिती व महिला सक्षमीकरण” कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेला औसा मतदारसंघातील हजारो महिला उपस्थित होत्या, यावेळी महिलांना तज्ञांनी स्मार्ट प्रकल्प, एनएलएम प्रकल्प आणि पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक व सामूहिक लाभांच्या योजनांची सविस्तर माहिती दिली . भविष्यात नियोजित प्रयत्न करून सदरील
योजनांचे लाभ महिलांना मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल असे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले . यावेळी आमदार अभिमन्यू पवार उपस्थित महिलांशी संवाद साधताना “कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रत्येक महिलेनं शेतीपूरक व्यवसाय करण गरजेचं आहे. शेतात काम करता करता दुग्ध व्यवसाय, शेळीपालन,
कुक्कुटपालन व मुरघास आदी प्रकारचे शेतीपूरक उद्योग सहजपणे करता येतात. या उद्योगांना 50% पासून 75% पर्यंत अनुदान आहे, उर्वरित खर्चासाठी बँकांमार्फत कर्ज मिळण्याची तरतूद सुद्धा आहे. म्हणजे अत्यल्प गुंतवणुकीत सुद्धा तुम्ही हे व्यवसाय करु शकता. शासकीय कार्यालयात खेटे मारले तरी योजनांचे लाभ नीट मिळत
नाहीत, पण मी योजनांचे लाभ घेऊन तुमच्यापर्यंत आलो असून शेतीपूरक उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्या” असे नम्र आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी या वेळी केले.
यावेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी ,उपविभागीय अधिकारी
अविनाश कोरडे, पशुसंवर्धन प्रादेशीक सहआयुक्त डॉ नाना सोनवणे ,उपायुक्त डॉ नानासाहेब कदम ,सहआयुक्त डॉ गिरमे, दीपक चाबुकस्वार, अॅड श्रीधर जाधव, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ श्रीधर शिंदे, संतोष मुक्ता, प्रा. भीमाशंकर राचट्टे, सुनील उटगे, लीड बॅंकेचे व्यवस्थापक शिंदे ,तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी
युवराज म्हेत्रे, औसा महिला फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा शोभा पवार, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते ,स्मार्ट योजना प्रमुख निलेश खलाटे, सोपान अकेले, कल्पना डांंगे, कल्पना ढविले, सोनाली गुळबिले, शिवगंगा मुरगे, अॅड परीक्षित पवार आणि हजारो महिला उपस्थित होत्या.