लातूर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, प्रशासकीय कार्यालयाच्या आणि काही पोलीस स्टेशनच्या बाजूच्या टपरीवर होतो खुलेआम गुटखा विक्री

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात आणि विशेषतः शहरात गुटखा विक्री खुलेआम चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्यात गुटखा बंदी असल्यामुळे गुटखा विकण्यास आणि साठवून ठेवण्यास बंदी असली तर लातूर जिल्हा याला अपवाद म्हणावा लागेल कारण जिल्ह्यात आणि लातूर शहरात गुटखा

रोजरास पने आलिशान दुकान थटून बिनधास्त विक्री होत आहे. यामुळे लातूर जिल्ह्यातील तरुणाई आणि विद्यार्थी व्यसनाधीन होत आहेत. यामुळे पालक चिंताग्रस्त आहेत. हा गुटखा विक्रीचा अवैद्य धंदा कोणाच्या आशिर्वादामुळे चालू आहे ? लातूर जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना या गुटखा

विक्रीची माहिती आहे का ? आणि असेल तर अद्याप कारवाई का नाही ? आणि सोमय मुंडे यांना याची माहिती असती तर आत्ता पर्यंत जिल्ह्यातील गुटखा विक्री बंद झाली असती जशी सोमय मुंडे यांनी पोलीस अधीक्षक पदाची सूत्र हाती घेतली होती तेव्हा जिल्ह्यात गुटखा विक्रीला चांगलाच लगाम लागला होता. जिल्ह्यातील अन्न व

औषध प्रशासन विभागाने अधिकारी विठ्ठल लोंढे यांना तर वेळच नाही असे त्यांच्या कार्यालयात गेल्यावर कळते कारण अन्न व औषध प्रशासन कार्यालयात ते कधी तर असतात आणि असले तरी इतके व्यस्त असतातकि त्यांना बोलायला वेळ नसतो! त्याला कारण ही तसेच आहेत, कारण लातूर अन्न व औषध प्रशासन विभागात पाहिजे तसे

मनुष्य बळ नसल्याने सर्व कामे बिचारे विठ्ठल लोंढे यांना करावे लागतात त्या मुळे त्यांना जिल्ह्यात विक्री होत असलेला गुटखा पकडन्यास वेळ मिळत नाही, पण लातूर पोलीस दला तर्फे कडक आणि ठोस कारवाया अपेक्षित आहेत, तरच लातूर जिल्ह्यातील गुटखा खऱ्या अर्थाने बंद होईल आणि जिल्ह्यातील तरुण आणि विद्यार्थी व्यसन

मुक्त होतील. गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत सर्वात जास्त गुटखा विक्री होत असल्याचे भयानक चित्र सध्या गोलाईतील बाजारात आहे, गांधी चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांनी जर मनावर घेऊन कारवाया केल्या तर गुटखा विक्रीला चांगला लगाम लागू शकतो

Recent Posts