महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गावर असलेल्या तीन मजली इमारतीला भीषण आग लागली ही घटना समजताच लातूरचे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी तात्काळ घटना स्थळी भेट देऊन घटनेची पूर्ण माहिती घेऊन, या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या
पारिजनांची भेट घेऊन सांत्वन केले . या आगीत तिघांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तर लोंढे यांच्याकडे
भाड्याने राहणाऱ्या तिघांनी साडीचा दोर करून कसा-बसा आपला जीव वाचवला. या आगीत गुदमरून मृत्यू झालेल्यामध्ये 80 वर्षीय कुसुमबाई शिवाजीराव लोंढे, 50 वर्षीय प्रमिला सुनील लोंढे या दोन महिलांचा समावेशे आहे. तर 58 वर्षीय सुनील शिवाजीराव लोंढे यांचा समावेश आहे. अग्निशमनच्या दोन बंबांनी ही आग
आटोक्यात आणली . याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत. या सर्व घटनेवरून मा. महापौर यांनी प्रशासनास विनंती केली आहे शहरातील व्यवसायिक इमारतींचे ऑडिट करावे, अग्निशमन उपकरणे उपलब्ध ठेवणे बंधनकारक करावे. फुलांचे बुके विक्रि करणाऱ्या दुकानामधील प्लास्टिकचा वापर यावर
बंदी बाबत पावले उचलावीत. नागरिकांनीही असे बुके घेण्यास नकार देवून विना प्लास्टिकचे बुके घेण्यावर भर द्यावा आणि लातूरकरांना आवाहन केले कि आपल्या व्यवसायिक दुकाने रात्री बंद करून बाहेर पडताना मेन स्विच बंद ठेवावे, कोणत्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक साधने यांचे वायर उघडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी.
तसेच अशा दुर्घटना घडल्यास घराबाहेर पाडण्यासाठी मार्ग उपलब्ध ठेवावा. या घटनेवरून आणि काही दिवसापूर्वी झालेले गॅस स्फ़ोट घटनेत नागरिकांच्या भेटीसाठी मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे प्रथम गेले होते. यावरून लातूरकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे दिसून आले आणि गोजमगुंडे यांच्या या लातूरकराप्रती असलेले काळजीचे लातूरकर कौतुक करत आहेत.