महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – सकल मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. त्यावेळी कुठे गालबोट लागले नाही मात्र आज जे काही घडत आहे ते दुर्दैवी आहे. सरकारने आरक्षण मिळावे यासाठी पाऊले टाकली आहेत,आरक्षणासाठी राज्यसरकार सकारात्मक आहे त्यामुळे मराठा समाजातील तरुणांनो राज्यसरकारने
दिलेले आरक्षण टिकले पाहिजे, कायद्याचा आधार असला पाहिजे त्यासाठी सहकार्य करा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे बुधवारी सायंकाळी प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांनी त्यांना काही प्रश्न
विचारले असता त्यावर सुनिल तटकरे यांनी उत्तरे दिली.
मराठा समाजाला आरक्षण दिले गेले पाहिजे ही राज्यसरकारची भूमिका आहे असे स्पष्ट करतानाच महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आरक्षण दिले गेले ते उच्च न्यायालयात टिकले नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही दिले गेले मात्र सर्वोच्च न्यायालयात काही
कायदेशीर बाबी नमूद करून आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. आताही आमची आरक्षण मिळावे हीच भूमिका आहे. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही एका झालेल्या बैठकीत आरक्षण दिले पाहिजे त्यामध्ये ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता दिले पाहिजे अशी भूमिकाही मांडण्यात आली होती आणि यावर एकमतही झाले होते.
कायद्याच्या कसोटीत आरक्षण टिकले पाहिजे असे मराठा नेतृत्वांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यसरकारने एक पाऊल पुढे टाकत शिंदे समिती स्थापन करून ही समिती राज्यव्यापी दौरा करत आहे. आरक्षण देण्याबाबत महायुतीतील पक्ष सकारात्मक आहेत असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.