महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – भारत सरकारच्या ‘एक तारीख एक घंटा एक साथ’ या अभियान अंतर्गत जवळपास पाच सहा ट्रॅक्टर घाण, केर कचरा, गवत झाडाच्या फांद्या, भंगार साहित्य, दारूच्या बाटल्या म्हणजे दहा ते बारा टन कचरा ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या चाळीस सदस्यांनी सकाळी साडेपाच ते नऊ म्हणजे साडेतीन तास
श्रमदान करून संविधान चौक ते रिलायन्स पेट्रोल पंप रस्ता दुभाजक चकाचक स्वच्छ केलं. झालेलं कार्य पाहण्यासाठी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सौ. वर्षा ठाकूर घुगे मॅडम आल्या होत्या. त्यांनी झालेले कार्य पाहून ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या सर्व सदस्यांचे कौतुक केलं, अभिनंदन केलं आणि महानगरपालिका प्रशासनांस
उपयुक्त अशा सूचना केल्या. श्रमदानाचे सुंदर असं कार्य करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ‘स्वच्छांजलि’ स्वरूपात श्रद्धांजली वाहण्यात आली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. पवन लड्डा, एड. वैशाली यादव, पद्माकर बागल, बाळासाहेब बावणे, दयाराम सुडे, नागसेन कांबळे, राहुल माने, आकाश सावंत, रवींद्र देशमुख, प्रवीण भराटे,
नितीन कामखेडकर, प्रा. मीनाक्षी बोंडगे, कल्पना कुलकर्णी, दिपाली राजपूत, तुळसा राठोड,चाटे सर, आदित्य स्वामी, ओंकार सदरे, नितीन पांचाळ, विजयकुमार कठारे, बालाजी उमरदंड, कांत मरकड, दिपक नावाडे, गणेश सूरवसे यांनी परिश्रम घेतले.