आमदार अभिमन्यू पवार यांनी स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत औसा शहरातील ऐतिहासिक किल्ला परिसराची स्वच्छता केली

महाराष्ट्र खाकी ( औसा / विवेक जगताप ) – राष्ट्रपिता महात्मा गांधी (Gandhi Jayanti) यांच्या 2 ऑक्टोंबरला असणाऱ्या जयंतीच्या 154 व्या पार्श्वभूमीवर आज, रविवारी (1 ऑक्टोबर) देशभर स्वच्छता मोहिम राबवली जात आहे. देशभरात स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत श्रमदान केलं जात आहे. या सेवा पंधरवडा व गड-किल्ले

स्वच्छता मोहीम अंतर्गत औसा शहरातील ऐतिहासिक किल्ला परिसरात औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आणि पक्षाच्या सहकाऱ्यांनी स्वच्छता अभियान राबविले. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या गड-किल्ले स्वच्छता मोहीम

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीदरम्यान देशात राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवडा अंतर्गत आज स्वच्छता कर्मचारी, पक्षातील सहकारी व औसेकर यांच्यासह औसा शहरातील ऐतिहासिक किल्ला परिसराची स्वच्छता केली. स्वच्छता ही आपल्या जीवनशैलीचा भाग बनणं गरजेचं आहे असं मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.

Recent Posts