महाराष्ट्र खाकी (लातूर / प्रतिनिधी ) – Bhagat Singh Birth Anniversary : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वादळ निर्माण करणारे क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती सर्वत्र उत्सहात वेगवेगळे उपक्रम घेऊन साजरी केली, जयंती निमित्तानं लातूर शहरातील बार्शी रोडवरील शाहीद भगत सिंग चौक येथे खाकी फाऊंडेशन च्या वतीने
देशातील चालू परीस्तितीवर मार्मिक संदेश देऊन आणि केक कापून क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती साजरी केली. खाकी फाऊंडेशन तर्फे लावण्यात आलेल्या बॅनर वर भगतसिंग जेल मध्ये बाजावर बसलेला फोटो आणि ” लाल सलाम… सिर्फ आझादी हमारा मकसद नही है आझादी का मतलब क्या है ? मुठीभर रईस और
ताकदवर हिंदुस्थानीओके हाथ लग जाए इससे आम इंसान के जिंदगी मे कोई फर्क आयेगा क्या मजदुर और किसान वर्ग के हालाथ बदलेंगे, उन्हे उनका सही हक मिलेगा…..नही…” असे लिहिले होते, बॅनर वरील लिहिलेला मेसेज (संदेश) वाचून बऱ्याच नागरिकांनी खाकी फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक करत होते
आणि या बॅनर सोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही असे दिसून आले. यावेळी गजानन भोसले, गजानन खटाळ, बंटी राठोड, अॅड.अभिजीत कांबळे, विनायक देशमुख, विक्रम चव्हाण, अभिजीत थोरात, यशपाल कांबळे, राहुल वेव्हारे, शैयलेश बनशट्टी आणि खाकी फाऊंडेशन चे अध्यक्ष विवेक जगताप, उपाध्यक्ष आनंद आडसूळे कोषाध्यक्ष शशिकांत फुलगामे इतर बराच युवा वर्ग उपस्तितीत होता.