महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी) – लातूर चे माजी संसदरत्न खासदार प्रो. डॉ. सुनील गायकवाड हे भारत सरकार च्या आयुष मंत्रालयाकडून घेण्यात आलेल्या “योगा थेरपिस्ट “ च्या अत्यंत अवघड अशा परीक्षेत चांगल्या मार्कांनी उतीर्ण झाले आहेत. भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांनी योगा ला
जगात ओळख दिली. त्यांच्या सोबत 16 व्या लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी केलेले लातूर चे माजी खासदार यांनी योगाच्या सर्व परीक्षा पास झाले आहेत. डॉ. सुनील गायकवाड हे अनेक विषयात पदवीधर असून 16 व्या लोकसभेत हायली एज्युकेटेड मेंबर ऑफ पार्लियमेंट असे हाई रेंज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड कडे नोंद झालेली आहे.
लातूर लोकसभेत अनेक विकास कामे केलेले खासदार अशी लोकप्रियता डॉ सुनिल गायकवाड यांची आहे. यापूर्वी ही भारत सरकार च्या आयुष मंत्रालय कडून योगाच्या “योगा इन्स्ट्रक्टर” आणि “योगा टिचर अँड ईवैल्यूयर “ या दोन परीक्षा ही डॉ गायकवाड चांगल्या मार्कानी पास झाले आहेत. योगा थेरपिस्ट चे भारत सरकार
च्या योगा सर्टिफिकेशन बोर्ड चे प्रमाणपत्र लातूर पतंजली युवा चे योगगुरु अमर वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आले.
माजी खासदार प्रो.डॉ. सुनील गायकवाड यांच्या या यशाबद्दल पतंजली योग विद्यापीठाचे संस्थापक योग गुरु रामदेव बाबा, योग गुरु आचार्य बालकृष्ण,पतंजली चे सचिन,आदी मान्यवरानी डॉ सुनील बळीराम गायकवाड
यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. डॉ. सुनील गायकवाड हे सतत नवीन नवीन ज्ञान घेण्याचा प्रयत्न करीत असतात.योग सर्टिफिकेशन बोर्ड भारत सरकार च्या तीन परिक्षा पास झाले आहेत. लोकप्रतिनिधी असून ही शिक्षणाची सतत ओड असणारे डॉ.सुनील गायकवाड हे तरुण पिढीसाठी एक आदर्श आहेत असा गौरव योगगुरु रामदेव बाबा यांनी केला आहे. सर्वत्र अभिनंदन आणि कौतुक केले जात आहे.