व्यायाम करणे म्हणजे आपल्या शरीराचे व आपले आयुष्य वाढविणे – संजय राजुळे

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – लातूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजय राजुळे यांनी गेल्या दोन वर्षापासून वॉट्स ग्रुप, फेसबुक, इन्सटाग्राम, युट्युब व रेग्युलर जाणार्‍या लोकांच्या मुलाखती घेत व्यायामाबद्दल सर्वांना जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहेत. जो कोणी सकाळी 6 वाजता उठणार नाही त्याच्या

घरी जावून मोर्चा काढायचा व त्याला व्यायामाचे मार्गदर्शन करायचे असा स्तुत्य उपक्रम ते गेल्या दोन वर्षापासून करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला आता गती येत असुन असंख्य मित्र परिवार हे सकाळी उठून नियमीत व्यायाम करतांना दिसत आहेत. एकंदर काय तर सर्वांनी नियमीत व्यायाम केलाच पाहिजे. व्यायाम करणे म्हणजे

आपल्या शरीराचे व आपले आयुष्य वाढविणे होय. जो व्यक्ती सकाळी लवकर उठुन व्यायाम करतो त्याचा दिवस चांगल्या प्रकारे जातो. तो दिवसभर फ्रेश माईंडने काम करतो. त्याला चांगल्या सवई लागतात. चांगले विचार त्याच्या मनात येतात. चांगली बुध्दी त्याला ईश्‍वर देतो. सकाळी उठून व्यायाम केल्याने तुम्हाला कामाबद्दल गोडी

निर्माण होते. तुमच्या मुला-मुलींना तुम्हाला वेळ देता येतो. तुमच्या फॅमिलीसोबत तुम्हाला वेळ घालविता येतो. मग ती स्त्री असो की पुरूष अशा सर्वांनीच व्यायाम करायलाच हवे याविषयी संजय राजुळे नवनवीन पध्दतीने मार्गदर्शन करतांना दिसतात. संजय राजुळे यांची व्यायामाबद्दलची तळमळ पाहून खरोखरच आज त्यांच्या मित्र परिवारातील

अनेक सदस्य हे व्यायामाबद्दल जागरूक झाले आहेत. त्यांनी फेसबुक, रिल्स, प्रत्यक्ष भेटून संवाद साधून समाजातील सर्व स्तरातील लोकात जागरूकता निर्माण करण्याचे काम ते ज्या जिद्दीने करत आहेत ते खरोखरच वखाण्याजोगे आहे. संजय राजुळे यांच्या या सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्रातील मोठमोठ्या व्यक्तींनी घेतली

असुन संजय राजुळे यांनी आतापर्यंत अनेक डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला, व्यापारी, राजकीय क्षेत्रातील पुढारी यांच्या मुलाखत घेवून त्यांच्यामार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. खरोखरच हे प्रेरणादायी असुन व्यायामाबद्दलीची जी जागरूकता संजय राजुळे सरांनी निर्माण केली आहे ती चांगली असुन सर्व लहान,

तरूण, वयोवृध्द महिला पुरूषांनी नियमीत व्यायाम करून आपले आरोग्य हे निरोगी सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे यासाठी संजय राजुळे हे सर्वांना ज्या पोटतिडकीने सांगत आहेत ते खरोखरच आपणही सर्वांनी त्यांचे ऐकायला हवे व आपले जीवन सुखकर बनवायलाच हवे. खरंच संजय राजुळे सर यांच्यासारख्या व्यक्तींमुळेच

आज समाज चांगल्या पध्दतीने प्रगती करताना दिसत आहे. कारण आजच्या धावपळीच्या युगात कोणी कोणाकडे लक्ष देत नाही पण संजय राजुळे हे व्यायामाच्या माध्यातून ज्या पध्दतीने जागृती करत आहेत ते खरोखरच उल्लेखनीय असुन सर्वांनी संजय राजुळे सरांचे अनुकरण करून सकाळी नियमीत उठून व्यायाम करून संजय

राजुळे यांना साथ द्यायला हवी व राजुळे यांनी सुरू केलेल्या ‘आपले आरोग्य, आपली जबाबदारी’ या मोहिमेतर्गत ‘आपण आपल्यासाठी नाही तर कोणासाठी’ हा विचार ध्यानीमनी ठेवून त्यांच्या या मोहिमेस यशस्वी बनविण्यासाठी सकाळी उठून नियमीत व्यायाम करायलाच हवे…!

Recent Posts