LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात LCB पथकाने महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

महाराष्ट्र खाकी लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसामध्ये वेग – वेगळ्या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि दागिने चालत्या गाडीवरून हिसकावून चोरण्याच्या गंभीर घटना घडल्या होत्या, हे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याकरिता (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे

यांच्या नेतृत्वात LCB पथकाची मोठी कार्यवाही केली आहे. चैन स्नॅचिंग मधील दोन आरोपींना अटक 74.3 ग्राम सोन्याचे दागिने,गुन्ह्यात वापरलेली, चोरीची मोटरसायकल असा एकूण 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, 6 गुन्हे उघड, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. पोलीस अधीक्षक सोमय

मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलिसांना आदेश केले होते. त्या अनुषंगाने (LCB) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते. या LCB पथकामार्फत जिल्ह्यातील विविध

गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती. याच दरम्यान दि.30 जुलै रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून चोरलेले सोन्याचे दागिने सराफांना विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या 2 आरोपींना जुने रेल्वे स्थानक परिसरातून 1)

रोहन उर्फ मिट्या मारुती गुंडले, वय 19 वर्ष, राहणार अंजनसोंडा, तालुका चाकूर जिल्हा लातूर. 2) अभंग काशिनाथ घोलपे, वय 29 वर्ष राहणार काळेवाडी तालुका शिरूर अनंतपाळ ,जिल्हा लातूर या दोघा आरोपींना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांनी मागील काही दिवसापासून लातूर शहरातील व

जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून जबरीने चोरून निघून जाण्याचे गुन्हे केल्याचे कबूल केले. त्यावरून लातूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचे अभिलेखाची माहिती घेतली असता MIDC पोलीस स्टेशन येथील चैन स्नॅचिंग चे 2 गुन्हे, गांधीचौक पोलीस स्टेशन

येथील 1 गुन्हा, लातूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथील 1 गुन्हा, उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेला 1 गुन्हा तसेच MIDC पोलीस स्टेशन येथील मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा असे दाखल असल्याचे दिसून आले आणि ते सहा गुन्हे LCB पाथकाकनाडून उघडकीस आले आहेत. आरोपींनी गुन्ह्यात चोरलेला सोन्याचे 74.3 ग्रॅम वजनाचे 5

मंगळसूत्रे तसेच एक पोलीस स्टेशन चोरीची मोटारसायकल व असा एकूण 3,15,300/-रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राठोड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, नाना भोंग, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख,नकुल पाटील यांनी केली आहे.

Recent Posts