Latur BJP सर्वांच्या सहकार्याने पुन्हा एकदा लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला सिद्ध करू या – जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख

महाराष्ट्र खाकी ( लातूर / विवेक जगताप ) – लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीची जिल्हा बैठक 31 जुलै 2023 सोमवार रोजी भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हा प्रभारी प्रा किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील भक्ती शक्ती मंगल कार्यालयात संपन्न झाली. भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव

देशमुख यावेळी बोलताना म्हणाले की, मी एक सामान्य कार्यकर्ता आहे भाजपाचा जिल्हाध्यक्ष होईल असे वाटत नव्हते मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि जिल्ह्यातील सर्व मान्यवर नेत्यांनी एक मुखाने माझ्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन काम करण्याची संधी

दिली. रात्र – दिवस मेहनत करून आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे जिल्ह्यात भाजपाचे प्रभावी काम करू लातूर जिल्हा भाजपाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा सिद्ध करू अशी ग्वाही भाजपाचे नूतन जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांनी दिली.या बैठकीस लातूर ग्रामीण विधानसभा प्रमुख आ रमेशआप्पा कराड, प्रदेश बुथ रचना

संयोजक अरविंद पाटील निलंगेकर, उदगीर विधानसभा प्रमुख सुधाकर भालेराव, प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, लोकसभा प्रचार प्रमुख राहुल केंद्रे, प्रा प्रेरणा होनराव, जयश्री पाटील, माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार गोविंद अण्णा केंद्रे, प्रदेश भाजपाचे अविनाश कोळी, महिला आघाडीच्या भाग्यश्री क्षीरसागर, बापूराव

राठोड, युवराज पाटील यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत नूतन भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या बैठकीस जिल्हा कार्यकारणी मंडल अध्यक्ष प्रमुख लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent Posts