गांधी चौक पोलीस स्टेशन पासून जवळ असलेल्या गंज गोलाई भागात होलसेल गुटखा विक्री दुकाने जोमात

महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – राज्यात बंदी असूनही शहरात सर्वत्र गुटखा, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत आहेत. पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे. लातूर शहराची मुख्य बाजार पेठ असलेल्या गंज गोलाई भागात अनेक होलसेल गुटखा विक्रेते आहेत, या

होलसेल दुकानदाराकडून लातूर ग्रामीण भागातील छोटे दुकानदार, टपरी धारक, हॉटेल चहा विक्रेते गुटखा विकत घेऊन बिनधास्त लातूर शहर आणि ग्रामीण भागात गुटखा विक्री करत आहेत. गंज गोलाई बाजार असलेला भाग गांधी चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे. होलसेल गुटखा विक्री दुकाने आणि गांधी चौक पोलीस स्टेशन यांच्यात

फक्त काही मिनिटांचा अंतर आहे तरी गुटखा विक्री बिनधास्त चालू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुटखा बंदी कागदावरच असल्यामुळे बेकायदा गुटकाविक्री जोमात सुरू आहे. (Latur District Crime News)शासनाचे लातूर मधील पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि महानगरपालिका प्रशासन याकडे

सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटकाविक्री जोरात सुरू आहे. लातूर शहरात आणि जिल्ह्यात उदगीर आणि शिरूर अनंतपाळ मार्गे गुटखा येत असल्याचे बोलले जात आहे. शहरातील ठराविक व्यक्ती नियमीतपणे व राजरोसपणे गुटक्याची वाहतूक करीत आहेत. पोलिसांकडून त्याकडे

जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. गुटखा शहरात आल्यानंतर ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो. तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो. गुटख्याच्या एका पुडीची किंमत 15 ते 20 रुपये आहे. गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात आहे. लातूरच्या

ग्रामीण भागातील खरेदीदारांना लातूर शहरातील किराणा मालाच्या दुकानातून गुटखा पुरविला जातो. शहरातील अनधिकृत टपऱ्या, छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटकाविक्री केली जाते. एक पानटपरीधारक महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करतो. शहरातील अनधिकृत टपरी व बांधकामांवर

महानगरपालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैध धंदेही सुरू होण्यास प्रोत्साहन मिळत आहे. पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई होत आहे तर अन्न व औषध प्रशासन विभाग लातूर शहर आणि ग्रामीण भागात फिरकतच नाही असे चित्र सध्या दिसून येत आहे. यामुळे हा गुटखा विक्रीचा अनधिकृत व्यवसाय सर्रास सुरु आहे

Recent Posts