महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – (LCB) स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना बीड, अहमदनगर मधून अटक करून घरफोडीचे 07 गुन्हे उघड केले आणि सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम सह 4 लाख 8 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त केला. लातूर
जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्र सोमय मुंडे यांनी हाती घेतल्या पासून लातूर जिल्हा पोलीस दलातील प्रत्येक पोलीस स्टेशन, विभाग आणि त्यांचे पोलीस अधिकारी यांच्या कामात कमालीचा फरक दिसून येत आहे. हे गुन्हे उकल होण्याच्या गतीवरून दिसून येत आहे. या मुळे जिल्ह्यातील नागरिक पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या
कार्य पद्धतीवर समाधान वेक्त करत आहेत. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी अनेक धडाकेबाज कारवाया केल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख कमी करण्यात ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे
यांचा मोठा वाटा आहे. LCB पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात लातूर जिल्ह्यात घडलेल्या घरफोड्याच्या संदर्भात तपास करण्यात येत होता. लातूर जिल्ह्यातील तसेच लातूर जिल्हालगत असलेल्या इतर जिल्ह्यातील गुन्हेगारांची माहिती काढण्यात येत होती. गुन्हेगारांची माहिती मिळवण्याकरिता बातमीदार नेमण्यात
आले होते. त्यांच्या मार्फतीने मिळालेल्या माहितीचे तसेच तांत्रिक माहितीचे बारकाईने विश्लेषण करण्याचे काम ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होते. गोपनीय बातमी दाराकडून मिळालेल्या विश्वासनीय व खात्रीलायक माहिती मिळाली की लातूर शहरामध्ये विविध पोलीस ठाण्याचे हद्दीत घरपोडीचे गुन्हे करणारे संशयित आरोपी हे
बीड, व अहमदनगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने दि. 02/11/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बीड, अहमदनगर जिल्ह्यात रवाना करण्यात आले. हे LCB पथके अहमदनगर जिल्ह्यात पोहोचून गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीची खात्री करून दि. 3 जून रोजी लातूर
जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी 1) अमोल धर्मा इगवे, 28 वर्ष, राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड. 2) गणेश मिलिंद सूर्यवंशी, वय 23 वर्ष, राहणार घूमेगाव , तालुका गेवराई जिल्हा बीड. 3) विकास सुनील घोडके, वय 27 वर्ष, राहणार मेनरोड, शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर. या आरोपींना
ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या अजून एक साथीदार आरोपीसह लातूर शहरातील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचे कबूल केले तसेच लातूर शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या गुन्हेगारांच्या रेकॉर्ड फाईलची तपासणी केली असता वरील
आरोपी त्यांनी संगणमत करून लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 3 घरफोडीचे गुन्हे व एमआयडीसी पोलीस स्टेशनत 4 घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले, घरफोडीच्या गुन्ह्यात चोरलेल्या सोन्या-चांदीच्या दागिने व रोख रक्कम असा एकूण 04 लाख 8 हजार रुपयेचा मुद्देमाल नमूद आरोपींताकडून
जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेत असून पुढील तपास शिवाजीनगर व एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व ( LCB ) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे
शाखा लातूर येथील सपोनी वेंकटेश आलेवार, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, यशपाल कांबळे, राजेश कंचे, संतोष देवडे, मोहन सुरवसे, रवी गोंदकर, मनोज खोसे, राहुल कांबळे, नकुल पाटील यांनी बजावली आहे.