महाराष्ट्र

लातूरचे मा.खा.डॉ सुनील गायकवाड यांना मैक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघा कडून पत्रकारिता पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र खाकी ( मुंबई / प्रतिनिधी ) – मैक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचा पत्रकारीते साठी दिला जाणारा पुरस्कार लातूर चे माजी लोकप्रिय खासदार तथा दैनिक अस्तित्वाचा शोध घेणारा सुपुत्र या दैनिकाचे संपादक प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना जाहीर झाला आहे. लातूर येथे 14 एप्रिल 1996 रोजी डॉ

बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे रस्त्यावर एका भिकाऱ्या महिलेच्या हस्ते प्रकाशन करून सुरुवात केली. कसली ही जाहिरात न घेता गेली 27 वर्ष नियमित दैनिक सुरु आहे. समाजातील तरुण तरुणी यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करावी आणि एकत्र कुटुंब जपावे असे लेख दर शुक्रवारी स्वतः डॉ सुनील बळीराम गायकवाड लिहत

असत. समाजाला चांगले संस्कार देण्याच्या उद्देशांनी सुरु केलेलं दैनिक आहे. त्यांच्या या वृतपत्र क्षेत्रातील उत्तम कामगिरी बद्दल मैक्स महाराष्ट्र व महापरिवर्तनवादी पत्रकार संघ यांच्या वतीने 11 जून रोजी नागोठणे तालुका रोहा जिल्हा रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे थेट वंशज स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी

खासदार छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी रिपब्लिकन सेना इंजि.आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पत्रकारितेचा मानाचा पुरस्कार संपादक डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना मोठ्या कार्यक्रमात दिला

जाणार असल्याचे संयोजक मैक्स महाराष्ट्र चे संपादक रविंद्र अंबेकर आणि महापरिवर्तनवादी पत्रकार संघाचे अध्यक्ष धम्मशील सावंत यांनी जाहीर केले आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संपादक प्रोफेसर डॉ सुनिल बळीराम गायकवाड यांना मिळालेल्या पत्रकारितेच्या पुरस्काराबद्दल सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Most Popular

To Top