महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – राज्यात पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 20 आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यात लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांची बदली झाली आहे. पृथ्वीराज बी.पी., IAS यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान,
मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्हाधिकारी म्हणून पृथ्वीराज बी पी यांनी आपल्या कार्यातून लातूरकरांच्या मानत जागा निर्माण केली होती. लातूर जिल्हाधिकारी म्हणून पृथ्वीराज बी पी यांनी सर्व प्रशासकीय अधिकारी वर्गाला सांभाळून घेत काम केले. लातूरचा पुढचा जिल्हाधिकारी म्हणून कोण असेल याची प्रतीक्षा लातूरकरांना लागली आहे.