महाराष्ट्र खाकी (लातूर / विवेक जगताप ) – मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी 11 हजार चौरस फूट जागेवर नोटबुक्सच्या माध्यमातून बाबासाहेबांचे भव्य-दिव्य चित्र साकारनारे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कौतुक आणि अभिनंदन केले, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या
जयंती निमित्त लातूर शहरात 11 हजार चौरस फूट जागेवर नोटबुक्सच्या माध्यमातून बाबासाहेबांचे भव्य-दिव्य चित्र साकारण्यात आले आहे. या संकल्पनेचे आणि खासदार सुधाकर शृंगारे यांचे सर्वच क्षेत्रातून आणि विशेषता विरोधी पक्षाकडूनही कौतुक होत आहे. लातूर शहर मनपाचे मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी अद्भुत.. अकल्पनीय..
राजकारण आपल्या ठिकाणी, पण चांगल्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे. आपल्या लातूर मध्ये अठरा हजार नोटबुकच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. कदाचित देशात प्रथमच अशी प्रतिमा साकारण्यात आली असावी. डोळ्याचे पारणे फेडणारी ही कलाकृती
साकारणाऱ्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि यासाठी पुढाकार घेणाऱ्या लातूरचे खासदार श्रीमान सुधाकरजी श्रंगारे यांचे विशेष अभिनंदन अशी पोस्ट केली आहे. पण मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या या अभिनंदन आणि कौतुकाच्या पोस्ट मुळे लातूरच्या राजकारणात एक आदर्श निर्माण केला आहे. करण
गोजमगुंडे यांनी त्यांच्या महापौर पदाच्या काळात अनेक कौतुकास्पद उपक्रम आणि कामे केली आहेत. विक्रांत गोजमगुंडे यांनी लातूर मनपाचे नाव राष्ट्रीय पातळीवर गाजवले होते तेव्हा खासदार सुधाकर शृंगारे यांनी त्यांचे असे अभिनंदन आणि कौतुक केले नव्हते एवढेच नाहीतर एका कार्यक्रमात खासदार शृंगारे यांनी मा. विक्रांत
गोजमगुंडे यांना ओळखलेही नव्हते की हे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे आहेत. खासदारांनी तर 31 मार्च रोजी विक्रांत गोजमगुंडे यांच्या वाढदिवसाच्या सध्या शुभेच्छा पण दिल्या नव्हत्या, असो मा. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांचे राजकारणातील संस्कर दिसून आले, इथून पुढच्या काळात तरी लोकप्रतिनिधी यांच्या कडून असे संस्कार दिसतील का ?