विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी लातूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या पाठिशी सक्षमपणे उभे रहा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

महाराष्ट्र खाकी ( लातूर / प्रतिनिधी ) – प्रारंभीच्या काळात 1987 ते 1993 या कालावधीत सभापती असताना लातूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीअंतर्गत काम करणार्‍या हमाल, मापाडी, गाडीवान, व्यापारी, शेतकरी यांच्यावरील अन्याय दूर करून न्याय देण्याचे काम आपण केलेले आहे. तसेच लातूर बरोबरच रेणापूर, मुरूड उपबाजारपेठ उभी

करण्याचे कामही आपण केलेले आहे. कामगारांना माथाडी बोर्ड लागू केले. बोर्डाच्या नावावर आज 80 कोटी रूपये जमा झाले आहेत. यातून माथाडी कामगारांना दिवाळी बोनस मिळते. त्यामुळे आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान परिवर्तन पॅनलला साथ द्या. लातूर बाजार समितील राज्यातच नाही

तर देशात नावलौकिक मिळवून देण्याचे काम आपण सर्वांना सोबत घेऊन आपण विकासकामांच्या माध्यमातून करू असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले. यावेळी ते राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या

नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी, व्यापारी, हमाल, गाडीवान परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ तांदूळजा व भिसेवाघोली येथे आयोजित प्रचारसभेत बोलत होते. यावेळी या प्रचार सभेला भाजपा युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा

उपाध्यक्ष निळकंठराव पवार, शिवराम कदम, बाबासाहेब देशमुख, नरसिंग इंगळे, महादेव गायकवाड, युवराज वीर, बब्रूवान पवार, धनंजय बाचपल्‍ले, अशोक भूजबळ, सुभाष गणगे, नानजकर, माऊली मोरे, नूरखाँ पठाण, डॉ.रंगनाथ भिसे, पंडीत जाधव, जाजू शेठ, उध्दव जाधव, काकासाहेब औशंके, अक्खतर पठाण, अशोक आडसूळ,

पोपट भिसे, हणमंत भिसे, परमेश्‍वर भिसे आदी मान्यवर उपस्थित होते तर भिसेवाघोली येथे प्रचार सभेला किशोर घार, नेताजी मस्के, शिवशरण थंबा, दत्तासाहेब भिसे, जयराम भिसे, शिवाजी भिसे, बबन भिसे, प्रभाकर मांदळे, मेहताब रणदिवे, माणिकराव साळुंके, सर्जेराव खोसे यांच्यासह मान्यवर उपस्थित होेते. यावेळी पुढे बोलताना

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, लातूर मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकर्‍यांवरील अन्याय दूर करून त्यांना न्याय देण्याचे काम आपण केलेले आहे. मी सभापती पदावर आलो तेव्हा लातूर बाजार समितीचे उत्पन्‍न 22 लाख रूपये होते तर माझा कार्यकाल पूर्ण झाल्यांनतर हे उत्पन्‍न साडेआठ कोटीवर गेले होते.

सभापती पदाच्या कालावधीत श्री.गौरीशंकर सोसायटीच्या माध्यमातून शंभर हमाल, व्यापारी, बांधवांना साडेचार हजार रूपयांमध्ये जागा व घर देण्याचे काम केले. त्याची किंमत आज आठ ते दहा लाखापर्यंत गेली. असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रचार सभेच्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार तांदूळजा व

भिसेवाघोली येथील संयोजन समितीच्यावतीने करण्यात आला. प्रारंभी नरसिंग इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. प्रचार सभेचे सूत्रसंचालन अब्दूल गालिब शेख यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माधवराव गायकवाड यांनी केले तर आभार बाबासाहेब देशमुख यांनी मानले. यावेळी या भागातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या

संख्येने उपस्थित होते. उजनीचे पाणी आणण्यास देशमुख अपयशी गेल्या अठराव वर्षापूर्वी उजनीचे पाणी लातूरला आणण्यासाठीच्या योजनेचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्याहस्ते केले होते. परंतु थेंबभर पाणी आणण्याचे कामही त्यांनी केलेले नाही. त्यानंतर तीन टर्म आमदार व मंत्री म्हणून काम करणार्‍या

आ.अमित देशमुखांनीही उजणीचे पाणी एक महिण्यात आणू अन्यथा आहे त्या पदाचा राजीनामा देऊ असे आश्‍वासन देऊनही ते उजनीचे पाणी आणू शकलेले नाही. तेच उजणीचे पाणी बारामतीला गेले, इंदापूरला गेले परंतु लातूरला उजनीचे पाणी आणण्यास लातूरचे आ.अमित देशमुख हे पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे

विकासाच्या प्रवाहात येण्यासाठी लातूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपाच्या पाठिशी सक्षमपणे उभे रहा असे आवाहन भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.

Recent Posts